आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत प्रकरणात नवीन दावा:शवागारात ठेवलेल्या सुशांतच्या मृतदेहाजवळ 45 मिनिटे थांबली होती रिया चक्रवर्ती, सुब्रह्मण्यम स्वामींचा प्रश्न- पुराव्यांसोबत छेडछाड करत होती का?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
अशी माहिती मिळाली आहे की, रिया चक्रवर्ती 15 जून रोजी सकाळी तीन जणांसह कूपर हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवलेल्या सुशात सिंह राजपूतच्या पार्थिवाजवळ गेली होती.
  • एका वृत्तवाहिनीने शवागारातील रियाचा व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला आहे. यावेळी रियासोबत आणखी तीन जण होते.
  • व्हिडिओ समोर आल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतो की, रियाला शवगृहासारख्या प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याची परवानगी कशी मिळाली?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने मुंबईत आपला तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात दररोज नवीन दावेही केले जात आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे 15 जून रोजी सकाळी रिया चक्रवर्ती कूपर रुग्णालयाच्या शवागारात ठेवलेल्या सुशांतच्या पार्थिवाजवळ सुमारे 45 मिनिटे थांबली होती, असे एका रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे. यासंदर्भातील व्हिडिओदेखील समोर आल्याचा दावा केला जात आहे.

  • व्हिडिओमध्ये रियासमवेत आणखी तीन लोक दिसले

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, त्यांना रियाचा एक व्हिडिओ मिळाला आहे, ज्यामध्ये रिया रुग्णालयाच्या शवागारात जाताना आणि सुमारे 45 मिनिटानंतर तेथून बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओ 15 जून रोजी सकाळचा असल्याचे सांगितले जात आहे. रियासोबत यावेळी दोन तरुण आणि एका मुलगीही दिसतेय. रियासोबत असलेली तरुणी ही श्रुती मोदी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर दोन तरुणांपैकी एक रियाचा भाऊ शोविक आणि दुसरा सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रश्न पडतो की रियाला शवागारात जाण्याची परवानगी कशी मिळाली? कारण शवागार हे एक प्रतिबंधित क्षेत्र आहे, ज्याच्या आत पोलिस आणि मृतांच्या कुटुंबियांच्या परवानगीशिवाय कोणीही जाऊ शकत नाही. सद्यपरिस्थितीत कोरोना व्हायरसमुळे सरकार आणि प्रशासन सर्व खबरदारी घेण्यावर जोर देत असताना शवागारात रिया आणि तिच्यासोबतचे तीन जण गेले कसे, हा प्रश्न उपस्थित होतोय.

  • सुब्रह्मण्यम स्वामींचा प्रश्न- पुराव्यासोबत छेडछाड झाली का?

व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “जेव्हा कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन सुरु होते तेव्हा रिया तिथे होती. पोस्टमॉर्टम चालू असताना ती खोलीच्या आत होती आणि पुराव्यांसह छेडछाड करीत होती का? तिला फेमी फेटल (खलनायिका) असे टोपणनाव दिले जावे", असे स्वामींनी म्हटले आहे.

  • सीबीआयने कूकला चौकशीसाठी ताब्यात घेतले

सीबीआयने सुशांत सिंह राजपूतचा कूक नीरजला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. मृत्यूच्या दिवशी म्हणजे 14 जूनच्या सकाळी सुशांतला ज्युस दिल्याचा दावा नीरजने केला होता. कागदपत्रे गोळा करण्यासाठी सीबीआयचे एक पथक वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या कार्यालयातदेखील पोहोचले होते.

  • सीबीआयचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही?

संरक्षण मंत्रालयाअंतर्गत डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सीबीआयची टीम थांबली आहे. असा दावा केला जात आहे की, सीबीआय अधिका-यांचा महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी कोणतेही हॉटेल किंवा राज्य शासकीय अतिथीगृहाऐवजी संरक्षण मंत्रालयाच्या अतिथीगृहात थांबण्याचा निर्णय घेतला आहे.