आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतच्या 'दिल बेचारा' चित्रपटातील को-अ‍ॅक्टर साहिद वैद म्हणाला - 'ड्राईव्ह हा एक वाईट चित्रपट होता ज्यात काम करुन सुशांत अडकला होता'

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ड्राईव्ह हा चित्रपट हेतुपरस्पर ओटीटीवर रिलीज करण्यात आला हे खोटे असल्याचे साहिल म्हणाला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला 50 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत आणि दररोज या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, सुशांतबरोबर ‘दिल बेचारा’ या चित्रपटात झळकलेला अभिनेता साहिल वैदने एका मुलाखतीत त्याच्याबद्दल बर्‍याच गोष्टी शेअर केल्या.

  • सुशांत ड्राइव्ह हा चित्रपट करुन अडकला होता

नवभारतला दिलेल्या मुलाखतीत साहिल म्हणाला, 'सुशांतला काय झाले होते, हे मला माहित नाही. पण सुशांत कमकुवत नव्हता हे मला माहित आहे. तो निमुटपणे सहन करणा-यांपैकी नक्कीच नव्हता. दुर्दैवाने, ड्राइव्ह एक वाईट चित्रपट बनला आणि तो या चित्रपटात काम करुन अडकला होता. करण जोहरला हा चित्रपट थिएटरमध्ये नेणे अवघड झाले होते. हा चित्रपट हेतुपरस्पर ओटीटीवर रिलीज करण्यात आला हे खोटे असल्याचे साहिल म्हणाला. 2019 मध्ये 'ड्राइव्ह' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता आणि त्याला टीकेचा सामना करावा लागला होता.

  • आत्महत्येच्या बातम्यांवर विश्वास बसत नव्हता

साहिल पुढे म्हणाला, 'जेव्हा मी सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकली तेव्हा माझा विश्वास बसला नाही. कुणीतरी चेष्ठा करतंय, असे मला वाटले होते. तो स्वत: चा जीव घेईल असे कधीच वाटले नाही. तो सेटवर कायम आनंदी असायचा आणि आजूबाजूच्या प्रत्येकाला हसवायचा. हे खरं आहे की, एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे समजणे कठीण असते. परंतु सुशांतकडे बघून तो डिप्रेशनमध्ये आहे, असे कधीच वाटले नाही.'

  • नेपोटिझम करिअरमध्ये अडथळा आणते

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर साहिल म्हणाला की, 'नेपोटिझम करिअरच्या सुरुवातीच्या काळात अडथळा नक्कीच निर्माण करते, पण एकदा तुमचे नाव झाले तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.'

2017 मध्ये दिलेल्या मुलाखतीत साहिल म्हणाला होता की, धर्मा प्रॉडक्शन काम करण्यासाठी खूप चांगली जागा आहे. ते कलाकार आणि क्रूची खूप काळजी घेतात. चित्रपट कसा बनवायचा आणि टीमला कसे प्रेरित करावे हे त्यांना माहित आहे.'

करण जोहरसोबतच्या बाँडिंगविषयी साहिल म्हणाला की, 'सुशांतच्या मृत्यूनंतर आता करण जोहर माझ्या मेसेजलाही उत्तर देत नाहीये. सुशांतच्या मृत्यूनंतर मी पण खूप घाबरलो आहे आणि कोणीतरी माझा हात धरला पाहिजे अशी इच्छा आहे. आशा आहे की, इंडस्ट्रीमध्ये सर्व काही लवकरच ठीक होईल.'