आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या आठवणीत बहिणी भावूक:थोरली बहीण राणीने लिहिले - आरतीचे ताट आहे, दिवा आहे, गोड पदार्थ आहे, पण तो हात नाही ज्याच्या मनगटावर मी राखी बांधू शकते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या बहिणींनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला.

आज रक्षाबंधनाचा सण आहे. प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत आहेत आणि त्याच्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करते. सोबतच आयुष्यभर आपले रक्षण करण्याचे वचन ती घेते. मात्र आजच्या दिवशी सुशांतच्या बहिणींच्या डोळ्यात अश्रू आहेत. सुशांतला या जगाचा निरोप घेऊन 50 दिवस उलटले आहेत.त्याला गमावल्याच्या दुःखातून त्याच्या बहिणी अद्याप सावरु शकलेल्या नाहीत. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याची थोरली बहीण राणीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली आहे.

गुलशन (सुशांतचे घरचे नाव), माझे बाळ
आज माझा दिवस आहे.
आज तुझा दिवस आहे.
आज आपला दिवस आहे.
आज रक्षाबंधन आहे.

पस्तीस वर्षानंतर हा पहिला असा दिवस आहे, जेव्हा आरतीचे ताट सजले आहे, औक्षणाकरता दिवा आहे. हळद- चंदनाचं गंध आहे आणि गोड पदार्थ सुद्धा आहेत. आज रक्षाबंधन आहे. पण.. तोच चेहरा नाही ज्याला मी औक्षण करु शकते, तो हात नाही ज्याच्या मनगटावर मी राखी बांधू शकते ते ओठ नाहीत ज्यांना मी गोड पदार्थ भरवू शकते. तो भाऊ नाही ज्याला मी मीठी मारु शकते.

तुझ्या जन्मानंतर सगळे जीवन आनंदाने भरुन गेले होतं. सगळीकडे आनंदी आनंद होता. पण आता तू नाहीस तर सुचत नाही मी काय करु? तुझ्याशिवाय जगणे अशक्य आहे. कधीच वाटले नव्हते की असाही दिवस पाहावा लागेल. रक्षाबंधन असेल पण तू नसशील हा विचारच करवत नाही. तुझ्यासोबत अनेक गोष्टी शिकल्या मग आता तुझ्याशिवाय जगायचे कसे शिकू? तुच सांग.
कायम तुझी
राणी दी.

  • श्वेता सिंह किर्तीनेही शेअर केली पोस्ट

सुशांतच्या आठवणींना उजाळा देताना त्याची आणखी एक बहीण श्वेता सिंह किर्तीनेही एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने सुशांतसोबतचे बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. यात सुशांत आपल्या बहिणींसोबत दिसतोय. श्वेताने या पोस्टसह लिहिले -माझ्या गोड बाळाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आम्ही तुझ्यावर खूप प्रेमतो आणि नेहमीच करत राहू. तू होता, आहे आणि कायम आमचा अभिमान राहशील.

बातम्या आणखी आहेत...