आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिया चक्रवर्तीच्या वडिलांवर आरोप:सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह म्हणाले -  जर सुशांत तीन सायकॅट्रिस्टकडून उपचार घेत होता तर रियाचे वडील त्याला वेगळे औषध का देत होते?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी या केससाठी वकील विकास सिंह यांची नियुक्ती केली आहे.
  • सुशांतच्या मित्राने खुलासा केला होता की, रिया चक्रवर्तीचे वडील सुशांतसाठी औषधे आणत असत.
  • वकील विकास सिंह म्हणाले की, सीबीआय तपास पूर्ण करेपर्यंत आम्ही जास्त काही सांगू शकत नाही.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीच्या वडिलांवर आरोप केले आहेत. विकास सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जर सुशांत तीन सायकॅट्रिस्टकडून उपचार घेत होता, तर रियाचे वडील त्याला का आणि कोणती औषधे देत होते? अलीकडेच सुशांतच्या मित्राने खुलासा केला होता की, रिया चक्रवर्तीचे वडील सुशांतसाठी औषधे आणत होते.

  • रियाचे वडील स्पेशलिस्ट डॉक्टर नव्हते

विकास सिंह यांनी सोमवारी सांगितले की, "काहीतरी नक्कीच गडबड आहे. रियाच्या वडिलांनी आपल्या कुटुंबातील कोणालाही औषध दिले नाही. रियाचे वडील लष्करी डॉक्टर होते आणि ते स्पेशलाइज्ड नव्हते. जसे रियाने सांगितले होते की सुशांत तीन मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेत होता तर मग तिच्या वडिलांनी सुशांतला औषधे कशी दिली?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

  • सुशांतच्या जेवणात काय मिसळले जायचे, याची चौकशी झाली पाहिजे

विकास सिंह पुढे असेही म्हणाले की, रिया सुशांतसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. अशा परिस्थितीत रियाच्या घरातूनही जेवण येत असे. त्या अन्नात काय मिसळले जायचे, हा प्रश्नही उपस्थित राहतो, असेही ते म्हणाले. सुरुवातीला सुशांतच्या कुटूंबाच्या वतीने पुढे न येण्याच्या प्रश्नावर विकास सिंह म्हणाले की, सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांना आला होता. पण जोपर्यंत सीबीआयचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत या प्रकरणी आम्ही जास्त काही सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले.

  • होमवर्क पूर्ण झाल्यानंतर सीबीआय रियाची चौकशी करेल

सुशांतच्या मृत्यूला 2 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. सीबीआय या प्रकरणात उशीरा आले आहे. मला वाटते सीबीआय पूर्ण तपास करुन रियाला चौकशीसाठी बोलावले. चौकशीत रियाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर तिला सीबीआयकडून अटकही होण्याची शक्यता सिंह यांनी वर्तवली आहे.