आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Feared That Rhea Chakraborty Might Implicate Him In Disha Salian Suicide Case, Reveals In New FIR Lodged By Actor's Father

एफआयआरमध्ये खुलासा:सुशांतच्या वडिलांचा आरोप -दिशा सॅलियनच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला वाटत होती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतला ब्लॅकमेल करायची रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला 44 दिवसांनी नवे वळण आले आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे. या एफआयआरची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानुसार, दिशा सॅलियनच्या आत्महत्या प्रकरणात रिया आपल्याला अडकवेल, अशी भीती सुशांतला वाटत होती, असे म्हटले गेले आहे. इतकेच नाही तर के.के. सिंह यांनी रियावर सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी काढल्याचाही आरोप लावला आहे. सुशांतला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून तिने पैसे उकळल्याचा आरोप के.के. सिंह यांनी लावला आहे.

  • सुशांतला ब्लॅकमेल करायची रिया

तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, 'माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. त्यासाठी तो जमीनही शोधत होता. पण रियाने त्याला रोखले. आपले ऐकले नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचे सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपले ऐकत नसल्याचे आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचे लक्षात आले तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला.'

  • रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला होता, घरातून दागिने, पैसे घेऊन निघून गेली

रिया सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होती. आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी तिने सुशांतचे घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली. यानंतर तिने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला फोन करुन रियापासून धोका असल्याचे सांगितले होते. रियाने आपल्याला धमकावले असून वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचे सुशांतने आपल्या बहिणीला सांगितले होते. सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती, असेही त्यांनी तक्रारीत सांगितले आहे.

  • सुशांतची समजूत घालण्यासाठी बहीण 3-4 दिवस त्याच्याबरोबर होती

सुशांतच्या वडिलांनी आपल्या एफआयआरमध्ये सांगितले की, "माझी मुलगी (जी मुंबईत राहते) सुशांतकडे गेली होती आणि तेथे ती तीन ते चार दिवस त्याच्यासोबत राहिली होती. सर्व काही ठिक होईल, असा धीर त्याला दिला. माझ्या मुलीची लहान मुले आहेत, त्यामुळे ती तीन चार दिवस त्याच्याकडे राहून घरी परतली. पण त्याच्या दोन दिवसांनीच (14 जून) सुशांतने आत्महत्या केली."

  • 25 जुलै रोजी एफआयआर दाखल झाला

पाटणा सेंट्रल झोनचे आयजी संजय कुमार यांनी सांगितल्यानुसार, एफआयआर 28 जुलै रोजी नव्हे तर तीन दिवसांपूर्वी म्हणजे 25 जुलै रोजी दाखल करण्यात आला आहे. तक्रार सुशांतचे वडील के. के सिंह यांनी नोंदवली आहे. एफआयआरमध्ये 341, 342, 380, 406, 420 आणि 306 चा कलमांचा उल्लेख आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंह यांच्या वकिलांनी त्यांना पाटण्यात एफआयआर नोंदवल्याचे माध्यमांपासून लपवण्याचा सल्ला दिला होता.