आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गटबाजीचा बळी:घराणेशाहीपेक्षा इंडस्ट्रीतील गटबाजीचा बळी ठरला सुशांत सिंह राजपूत, दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ‘पानी’ चित्रपटानंतर झाली वादाला सुरुवात

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्गज अभिनेत्यांनुसार ‘छिछोरे’ नंतर मोठा चित्रपट मिळाला नसल्याने गेला नैराश्यात
  • ‘पानी’ रद्द झाल्यानंतर अनेक चित्रपटांतून सुशांतला काढण्याचा आरोप यशराजवर लागला

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पूर्ण देशभरात बॉलीवूडच्या गटबाजीची चर्चा सुरू आहे. बॉलीवूडमध्ये असलेला वर्चस्ववाद आणि गटबाजीमुळे सुशांतने आत्महत्या केली, असे सर्वांना वाटू लागले आहे. मात्र अजून त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नाही. मात्र दिव्य मराठीने बॉलीवूडमधील काही दिग्गज कलाकारांकडून जाणून घेतले, खरंच बॉलीवूडमध्ये वर्चस्ववाद आणि गटबाजीचे स्वरूप इतके गंभीर आहे का ? खरंच सुशांत या गटबाजीला बळी पडला का?

दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ‘पानी’ चित्रपटानंतर झाली वादाला सुरुवात

इंडस्ट्रीमध्ये मोठे पंडित मानले जाणारे यशराज, साजिद नाडियादवाला आणि धर्मा यांनी टॅलेंट मॅनेजमेंटची सुरुवात केली आहे. ते ज्यांना लाँच करतात त्यांच्यासोबत तीन चित्रपटांचा करार होतो. त्यानंतर कलाकार कोणत्याही नवीन बॅनरसोबत काम करू शकत नाही. हा करार लिखित स्वरूपात असताे. याचा उद्देश क्षमता असलेल्या कलाकाराला आपल्यापर्यंत मर्यादित ठेवणे हा आहे. यासाठी रणवीरसिंह, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि अनुष्का शर्मासारखे मोठे कलाकार येतात. ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही यशराजसोबत केली. यशराजने सुशांतसोबतही तीन चित्रपटांचा करार केला होता. यामध्ये‘ब्योमकेश बक्शी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि शेखर कपूरच्या ‘पानी’चा समावेश होता. या पूर्ण प्रकरणात पानी या चित्रपटापासून गडबड सुरू झाली. शेखर कपूर सुरुवातीला हा चित्रपट हॉलीवूडसाठी बनवत होते. नंतर भारतात बनवण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचे बजेट वाढत गेले आणि शेवटी यशराज यांच्याकडून हात काढून घेण्यात आले. येथेच सुशांत आणि यशराज यांचे संबंध बिघडले.

पानी’ या चित्रपटासाठी सुशांतने अनेक संधी नाकारल्या होत्या, पण तो चित्रपटच रखडला. त्यामुळे सुशांत दुसऱ्या बॅनरचे चित्रपट करू लागला. या काळात भन्साळी यांनी ‘राम-लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ साठी साइन केले. पण यशराज यांनी आपल्या शक्तीचा वापर करून हे चित्रपट सुशांतऐवजी रणवीरसिंहला देण्यास भाग पाडले. यानंतर करण जोहरने सुशांतला ‘ड्राइव्ह’ चित्रपटासाठी साइन केले पण या चित्रपटाला दोन वर्षे रिलीज करू दिले नाही. फायनली तो डिजिटलला विकण्यात आला आणि चित्रपट फ्लॉप झाला. येथे सुशांतने करणचा विरोध करायला सुरुवात केली. यानंतर माध्यमांचा वापर करत सुशांत निर्मात्यांसोबत अनेक अटी-शर्ती ठेवून काम करतो, अशी बातमी पसरवण्यात आली. यानंतर सुशांतला इंडस्ट्रीमधून बायकॉट करायला सुरुवात झाली. त्याला पार्टीत बोलवणे बंद केले. याच काळात साजिद नाडियादवाला यांचा छिछोरे रिलीज झाला आणि हिट झाला. तरीही साजिदने सुशांतसोबत पुढचे करार केले नाहीत. यशराज, करण जोहर आणि साजिद नडियादवाला यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सुशांत आणखीनच नैराश्यात गेला. ज्या प्रॉडक्शन हाऊसने सुशांतला ब्लॉक केले होते, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

इंडस्ट्रीत गटबाजी आहे या बातमीला कंगना रनोट, प्रीतीश नंदी, हन्सल मेहता आणि रणवीर शौरीसारख्या कलाकारांनी दिला दुजाेरा

कंगनाने भास्करशी बोलताना करण जोहरवर बरेच आरोप लावले आहेत. कंगना म्हणाली, उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये करण कधीच सुशांतचे नाव घेत नव्हता. तो फक्त सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि टायगर श्रॉफ यांचेच नाव घेत होता. आलिया भटने तर वर्ल्ड टेलिव्हिजन टीव्हीवर सुशांत कोण आहे ? असे विचारले होते. करण फार विचित्र वागतो. चित्रपट त्याच्या मनाप्रमाणे झाला नाही तर किंवा एखाद्या कलाकाराने त्याचे काम ऐकले नाही तर तो त्याचे करिअर उद्ध्वस्त करून टाकतो.

प्रीतीश नंदी म्हणाले..., सुशांतच्या मृत्यूला बॉलीवूडमधील एक गँग जबाबदार आहे. एक गँग आहे, ती सर्व काही कंट्रोल करत असते. नवीन कलाकारापासून ते पुरस्कार समारंभापर्यंत सर्व काही त्यांच्या हातात आहे. जे बाहेरचे लोक त्यांच्या कामात अडथळे आणतात, जे त्यांची जीहुजुरी करत नाहीत, ते त्यांना त्रास देतात. यासाठी ते अनेकदा मीडियाचा आधार घेतात. मग तो अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्माता असो, सर्वांना त्यांच्या मनानुसार काम करावे लागते. जो त्यांचे ऐकत नाही त्यांना अशी किंमत चुकवावी लागते.

भन्साळीच्या टीमने दिले स्पष्टीकरण

भन्साळीच्या गोटातील सूत्रानुसार, भन्साळी आणि सुशांतमध्ये कधीच भांडण नव्हते. भन्साळीने त्याला चित्रपट ऑफर केले होते, मात्र वेळेअभावी ते बनले नाहीत. दोघेही एकमेकांचा आदर करत. ते नेहमी बेालतही बसत. भन्साळीवर जेव्हा करणी सेनेने हल्ला केला होता तेव्हा सुशांतनेदेखील त्याचा विरोध केला होता. मात्र भन्साळीने त्याला चार चित्रपटातून काढल्याचे काही लोक म्हणतात. ते खोटे आहे.

बातम्या आणखी आहेत...