आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांचे प्रेम:सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरची धूम, अ‍ॅव्हेंजर्स सीरिजच्या चित्रपटांना पछाडत यूट्यूबवर मिळवले सर्वाधिक लाइक्स 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या चित्रपटाच्या ट्रेलरला 25 मिलियन म्हणजेच अडीच कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्टारर ‘दिल बेचार’चा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला त्याच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून रिलीजच्या काही तासांतच यूट्यूबवर एक नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. 24 तासांत या ट्रेलरला सर्वाधिक लाइक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे या ट्रेलरने याबाबतीत अ‍ॅव्हेंजर्स सीरिजचे चित्रपट 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम' आणि 'अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर' या हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे.  

सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारात 'दिल बेचारा'चा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाला.  आणि सुरुवातीच्या 21 तासांत त्याला  5.5 मिलियन लाईक्स मिळाले. यापूर्वी 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम' या चित्रपटाच्या ट्रेलरला 3.2 मिलियन  लाईक्स मिळाले होते, तर 2017 मध्ये आलेल्या 'अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर'च्या ट्रेलरला आतापर्यंत 3.6 मिलियन लाईक्स मिळाले. सुशांतच्या चित्रपटाच्या ट्रेलरला 25 मिलियन म्हणजेच अडीच कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. 

'दिल बेचारा'चा ट्रेलर रिलीज होताच 21 तासांच्या आत त्याला 5.5 मिलियन लाइक्स मिळाले.
'दिल बेचारा'चा ट्रेलर रिलीज होताच 21 तासांच्या आत त्याला 5.5 मिलियन लाइक्स मिळाले.
'दिल बेचारा'पूर्वी सर्वाधिक लाइक्स मिळवल्याचा रेकॉर्ड 'अॅव्हेंजर्स' सीरिजच्या इन्फिनिटी वॉरच्या नावी होता.
'दिल बेचारा'पूर्वी सर्वाधिक लाइक्स मिळवल्याचा रेकॉर्ड 'अॅव्हेंजर्स' सीरिजच्या इन्फिनिटी वॉरच्या नावी होता.
  • 'कसे जगायचे ते आपल्या हातात आहे'

किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. सुमारे अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एक सेकंदही सुशांतवरुन नजर हटत नाही. तर किझीच्या भूमिकेत संजनाही लक्षात राहतेय. ट्रेलरमध्ये सुशांतचे अनेक उत्कृष्ट संवाद आहेत, ज्याद्वारे त्याने चित्रपटात कॅन्सरशी लढा देत असलेल्या संजना सांघीला हसवताना आणि तिचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधील सुशांतचा एक संवाद अधिक लक्ष वेधून घेतो. 'जन्म आणि मरण आपल्या हातात नाही पण कसे जगायचे हे आपल्या हातात आहे', हा सुशांतचा संवाद मनाला भिडतो.

  • मुकेश छाबरांचा पहिला डिरोक्टोरियल चित्रपट 

'दिल बेचारा' हा कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी हा चित्रपट 'किझी और मॅनी' या नावाने तयार केला जात होता, परंतु फेब्रुवारी 2019 मध्ये त्याचे नाव 'दिल बेचारा' असे ठेवण्यात आले. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. ए. आर. रेहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे.  

  • चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख दोन वेळा बदलली

मुकेश छाबरा दिग्दर्शित हा चित्रपट यापूर्वी 29 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणास्तव त्याची रिलीज तारीख 8 मे 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, कोरोनव्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला आणि सिनेमा हॉल बंद पडले. त्यामुळे चित्रपट मोठ्या स्क्रीनपर्यंत पोहोचू शकले नाही.

  • सुशांतच्या मृत्यूनंतर हा चित्रपट विशेष बनला

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी सुशांतने मृत्यूला कवटाळले.  तरूण, हुशार आणि लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.  आणि सुशांतबद्दलची चाहत्यांची सहानुभूती मोठ्या प्रमाणात वाढली. त्यानंतर लोक उत्सुकतेने त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...