आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह राजपूतची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात आला होता सुशांत, स्मितहास्य बघून एकता कपूरने दिला होता 'पवित्र रिश्ता'मध्ये लीड रोल

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतची स्माइल बघून एकता कपूरने त्याला 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य भूमिका दिली होती.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज पहिली बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. तो जर आज आपल्यात असता तर त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असती. एक नजर टाकुयात कायम हसतमुख राहिलेल्या सुशांतच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टींवर...

21 जानेवारी 1986 रोजी जन्मलेला सुशांतसिंह राजपूत चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. शिक्षणात खूप हुशार होता. 11 वीत फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये गेला होता. तेथे त्याला सुवर्णपदक मिळाले होते. त्याची एक बहीण मितु सिंह राज्यस्तरीय पातळीची क्रिकेटरदेखील होती. तो आपल्या आईच्या खूप जवळचा होता. मात्र 2002 मध्ये त्याच्या आईच्या निधनानंतर त्याचे पूर्ण कुटुंब पाटण्यावरून दिल्लीला शिफ्ट झाले होते. मात्र नंतर त्याचे कुटुंब पाटण्याला परतले. करिअर बनवल्यानंतर 17 वर्षांनी सुशांत पाटण्याला गेला होता. त्याच्या एका बहिणीचेही निधन झाले होते.

जेईईईमध्ये मिळाली होती सातवी रँक
दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत असतानाच सुशांतने श्यामक डावरचा डान्स ग्रुप जॉइन केला होता. याबरोबरच तो अभिनयाचे धडेही घेत होता. सुशांतची एआयईईईमध्ये ऑल इंडियामध्ये 7 वी रँक आली होती. मात्र शिक्षण अर्धवटच सोडून तो ग्लॅमरच्या जगताकडे वळला. यात आपले करिअर करण्याचा विचार करू लागला.

अभ्यासासोबतच सुशांतने श्यामक दावरचे डान्स क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. श्यामकसोबत सुशांतने देश-विदेशात अनेक शोज केले. याबरोबरच अनेक चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर्सचेही काम केले. त्यासोबतच नादिरा बब्बरसोबत थिएटरदेखील केले. इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षाला असताना त्याने अभ्यास अर्धवट सोडला आणि अभिनयात करिअर बनवण्यासाठी मुंबई गाठली.

सुशांतने श्यामकच्या डान्स ग्रुपसोबत ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये परफॉर्म केले होते. त्याने ऐश्वर्या राय बच्चनसोबत ज्युनिअर डान्सर म्हणून डान्स केला होता.

अशी मिळाली होती पहिली संधी

डान्सनंतर सुशांत बॅरी जॉनचे अभिनय वर्कशॉपमध्ये सहभागी झाला होता. अनेक थिएटर केल्यानंतर त्याला 'किस देश में है मेरा दिल' हा शो मिळाला. सुशांतची स्माइल बघून एकता कपूरने त्याला 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य भूमिका दिली होती. या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला होता.

सुशांत आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. त्याचे पहिले रिलेशनशिप मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये त्याची सहकलाकार अंकिता लोखंडेसोबत राहिले. सहा वर्षांच्या नात्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. पण दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपचे कारण समोर येऊ दिले नाही. यानंतर त्याचे नाव अभिनेत्री कृती सेननसोबतही जोडले गेले. तो तेव्हा तिच्यासोबत 'राब्ता' चित्रपट करत होता. यानंतर तो आपली सहकलाकार संजना सांघीसोबत फिरताना दिसला होता. निधनाआधी सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते.

'काय पो चे' होता पहिला चित्रपट
सुशांतने अभिषेक कपूरच्या 'काय पो चे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यानंतर तो शुद्ध देसी रोमान्स, पीके, ब्योमकेश बक्क्षी यांसाह अनेक चित्रपटांत झळकला होता.

'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. त्याच्या निधनाच्या दीड महिन्यांनी म्हणजे 24 जुलै रोजी हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज केला गेला. गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांत मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. त्याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन प्रमुख एजन्सी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...