आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवशी चाहते झाले भावूक, फोटो शेअर करत बहीण श्वेता म्हणाली - तू माझा भाग आहेस आणि कायमच राहाशील…

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज सुशांतचा वाढदिवस आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला आठ महिन्यांचा काळ लोटून गेला आहे. आज सुशांत आपल्यात असता तर त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असती. त्याच्या आठवणीत चाहते भावूक होताना दिसत आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवसापासून म्हणजे बुधवारपासून चाहते सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

बहीण श्वेता सिंह किर्ती म्हणाली...
सुशांतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने त्याच्या नावे एक पोस्ट केली आहे. तिने सुशांत आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिले, 'लव्ह यु भाई! तू माझा भाग आहेस आणि कायमच राहाशील…' #SushantDay हा हॅशटॅग तिने जोडला आहे.

इतकेच नाही तर बुधवारी सोशल मीडियावर 'One day for SSR birthday' ट्रेंड करत होते. चाहत्यांनी सुशांतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, ‘सुशांत तू परत ये’, असे म्हटले आहे. एका यूजरने लिहिले, ‘परत ये, या जगाला तुझी गरज आहे...’ असे म्हटले आहे.

सुशांतच्या आणखी एका चाहत्याने लिहिले, '21 जानेवारी… बॉलिवूडच्या इतिहासात कुठल्या अभिनेत्याच्या वाढदिवसासाठी इतकी उत्सुकता कधीही पाहायला मिळाली नाही.'

सुशांतच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया..

गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांत मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. त्याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन प्रमुख एजन्सी करत आहेत. सुशांत अखेरचा दिग्दर्शक मुकेश छाबरांच्या 'दिल बेचार' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात संजना संघी त्याच्यासोबत झळकली होती. सुशांतच्या निधनानंतर हा चित्रपट त्यांच्या स्मृतीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सुशांत 'काय पो छे', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'पीके', 'केदारनाथ', 'सोनचिरिया' या गाजलेल्या चित्रपटांत झळकला होता.

बातम्या आणखी आहेत...