आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या फ्लॅटला अडीच वर्षांनी अखेर भाडेकरू मिळाला:महिन्याला तब्बल 5 लाख रुपये भाडे आणि 30 लाख डिपॉझिट

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जग सोडून अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र तो ज्या फ्लॅटमध्ये राहात होता, तो फ्लॅट आतापर्यंत रिकामा होता. हा फ्लॅट घेण्यास कोणीही तयार होत नाही, असे ब्रोकर रफिक मर्चंट यांनी दोन महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत सांगितले होते. फ्लॅट पाहण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या फ्लॅटचा इतिहास समजतो आणि सुशांत सिंह राजपूतचे निधन याच फ्लॅटमध्ये झाल्याचे समजते, तेव्हा कोणीही इथे राहण्यास तयार होत नाही असे त्यांनी सांगितले होते.

आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फ्लॅटसाठी एक भाडेकरू मिळाला आहे. मुंबईतील रिअल इस्टेट ब्रोकर रफिक मर्चंट सांगतात की, एका व्यक्तीने महिन्याला 5 लाख रुपये भाड्याने फ्लॅट घेतला आहे. 5 लाख रुपये भाड्याशिवाय भाडेकरूला 30 लाख रुपये सिक्योरिटी जमा करावी लागणार आहे.

फ्लॅटची डिपॉझिट मनी 30 लाख रुपये
ब्रोकर रफिक मर्चंट म्हणाले - 'लोक सुशांत राहत असलेला हा फ्लॅट घेण्यासाठी घाबरतात. पण आता आम्हाला एक भाडेकरू मिळाला आहे. गोष्टी अंतिम करण्यासाठी आम्ही कुटुंबाशी चर्चा करत आहोत. चर्चा अंतिम टप्प्यात आहे.' मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लॅटचे भाडे आणि ब्रोकरेज व्यतिरिक्त भाडेकरूला 30 लाख रुपये सिक्योरिटी जमा करावी लागेल. ही सिक्योरिटी 6 महिन्यांचे डिपॉझिट असेल.

फ्लॅटचा इतिहास माहित असल्याने लोक तो घेण्यास नकार देतात
रिअल इस्टेट ब्रोकर रफिक मर्चंट यांनी दोन महिन्यांपूर्वी या फ्लॅटचा एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले होते. जेव्हा मीडियाने त्यांना विचारले की, हा तोच फ्लॅट आहे का जिथे सुशांत सिंह राजपूत राहत होता, तेव्हा त्यांनी हो असे उत्तर दिले होते.

याशिवाय ते म्हणाले होते, 'हा फ्लॅट घेण्यासाठी भाडेकरू मिळत नाहीये. कोणाला फ्लॅट घ्यायचा असेल आणि त्याला या फ्लॅटचा इतिहास कळताच तो नकार देतो. लोक हा फ्लॅट घ्यायला घाबरतात.' रफिक यांनी सांगितल्यानुसार, फ्लॅटचा मालक त्याचे दर कमी करू इच्छित नाही, कारण त्याने तसे केल्यास फ्लॅट लवकरच विकला जाईल.

मालकाला फिल्मस्टार्सना फ्लॅट द्यायचा नाही
रफिक मर्चंट यांनी सांगितल्यानुसार, मालकाला हा फ्लॅट कोणत्याही चित्रपट कलाकारांना भाड्याने द्यायचा नव्हता. रफिक म्हणाले होते - 'या फ्लॅटचा मालक एनआरआय आहे आणि आता तो हा फ्लॅट कोणत्याही फिल्म स्टारला भाड्याने देऊ इच्छित नाही. मग तो कितीही मोठा सेलिब्रिटी असो. कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत व्यक्तीला फ्लॅट द्यायला हवा, असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे.'

या फ्लॅटसाठी सुशांत 4.51 लाख रुपये भाडे देत होता
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूपासून हे घर रिकामे होते. समुद्राच्या बाजूला असलेल्या या अपार्टमेंट फ्लॅटमध्ये चार मोठ्या खोल्या आहेत. त्यात एक मोठा हॉल आणि ड्रॉईंग रूम आहे. सुशांत या फ्लॅटचे दरमहा 4.51 लाख रुपये भाडे देत असे.

14 जून 2020 रोजी सुशांत या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडला होता. प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे दिसून आले, मात्र नंतर प्रसारमाध्यमे आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. गेल्या सीबीआयच्या अहवालात मृत्यूचे खरे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले होते.

सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असताना त्यात ड्रग्ज अँगल समोर आला. याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास केला होता. ड्रग्ज सिंडिकेटची चर्चाही तपासात उघड झाली.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात अडकली होती. रियावर स्वतः ड्रग्ज घेण्याचा आणि सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोप होता. याशिवाय सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर सुशांतचा मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...