आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा सॅलियान प्रकरण:समोर आला मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ, भावी पती आणि मित्रांसोबत पार्टी करताना दिसतेय दिशा; मैत्रिणीने सांगितले 'त्या' रात्री नेमके काय घडले होते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • असा दावा केला जातोय की, हा व्हिडिओ 8 जूनच्या रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी दिशाने वॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट केला होता.
  • दिशाच्या आईने सांगितले की, मृत्यूच्या दिवशी ती तिच्या भावी पतीसोबत एका मित्राच्या घरी छोट्याशा गेट टू गेदरसाठी गेली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिचा एक व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, हा व्हिडिओ तिच्या मृत्यूच्या एका तासापूर्वीचा आहे. व्हिडिओत दिशा आपल्या मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ दिशाने 8 जूनच्या रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी आपल्या मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पोस्ट केला होता, असाही दावा केला जातोय. याच्या तासाभरानंतर तिने आत्महत्या केली होती.

व्हिडिओत दिशा, तिचा होणारा पती रोहन, आणि मित्र हिमांशू, नील व दीप हे दिसत आहेत. व्हिडिओत दिशा अतिशयआनंदी दिसतेय. त्यामुळे एवढे आनंदी असताना ती आत्महत्या कशी करेल? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित झाला आहे. या व्हिडिओबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दिव्य मराठी या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

  • दिशाच्या मैत्रिणीने सांगितले 'त्या' रात्री काय घडले होते?

त्या रात्री नेमके काय घडले होते, हे तिच्या एका मैत्रिणीने सांगितले आहे. ‘इंडिया टुडे’ला दिशाच्या मैत्रिणीने सांगितल्यानुसार, पार्टीत सर्वांनी मद्यपान केले होते. मद्यपानानंतर दिशा फार भावूक झाली आणि तिची कोणाला काळजीच नाही असे वारंवार बोलत होती. त्यानंतर रात्री तिने युकेतील एका मित्राला फोन केला. फोनवर ती रडू लागली होती. त्याच्याशी फोनवर बोलत असतानाच दिशा दुसऱ्या रुममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ झाल्यामुळे दिशाच्या मित्रांनी मिळून दरवाजा तोडला. पण रुममध्ये दिशा कुठेच नव्हती. जेव्हा हिमांशू आणि दीपने खिडकीतून खाली पाहिले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सर्वजण खाली धावत गेले पण तोपर्यंत दिशाचा मृत्यू झाला होता.

  • मुंबई पोलिस पुन्हा एकदा या प्रकरणात सक्रिय झाले

8 जून रोजी दिशाने आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचे काही कनेक्शन आहे का, असेही प्रश्न चाहत्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केले. आता दिशाच्या मृत्यूच्या 57 दिवसांनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित लोकांकडे माहिती मागितली आहे. मालवणी पोलिसांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध करुन दिशाच्या अपघाती मृत्यूसंदर्भात काहीही माहिती असल्यास ती मालवणी पोलिसांना देण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...