आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:सुशांत सिंह राजपूतचा EX मॅनेजर ऋषिकेश पवारला NCB केली अटक, सुशांतला ड्रग्ज पुरवत असल्याचा आहे आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचा हाऊस मॅनेजर दीपेश सावंतनेही ऋषिकेश सुशांतसाठी ड्रग्ज आणत असल्याचा दावा केला होता.

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणा-या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी एक मोठी कारवाई करत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या माजी मॅनेजर ऋषिकेश पवारला अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पवार फरार होता. एनडीपीएस कोर्टाकडून जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. अनेक वेळा समन्स बजावल्यानंतरही पवार तपास यंत्रणेसमोर हजर झाला नव्हता.

दीपेश सावंतनेही घेतले होते पवारचे नाव
काही महिन्यांपूर्वी एनसीबीने अटक केलेल्या एका ड्रग पेडलरने पवारचे नाव घेतले होते. सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंतनेही आपल्या जबाबात ऋषिकेश पवारचे ना घेत तो सुशांतला ड्रग्ज पुरवत असल्याचा आरोप केला होता. पवारने सुशांतबरोबर काही काळ काम केले होते, परंतु सुशांतसोबतचे काम सोडल्यानंतरही तो त्याच्यासाठी ड्रग्ज पुरवठा करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

एनसीबी बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची सातत्याने चौकशी करत आहे
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडला होता. त्याच्या निधनानंतर सीबीआय, ईडी, एनसीबी, मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, पण अभिनेत्याच्या मृत्यूमागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.

या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला एक महिना तुरूंगात राहावे लागले होते तर तिचा भाऊ शोविक हादेखील 3 महिने तुरुंगात होता.

यानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस आले. दीपिका पदुकोणसह अनेक अभिनेत्रींची याप्रकरणी चौकशी करण्यात आली. अभिनेता अर्जुन रामपाललाही याचा फटका बसला. 30 पेक्षा जास्त ड्रग्ज पेडलर्सना अटक करण्यात आली आहे. एनसीबी अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...