आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र सुरजित सिंह राठोड बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तो लवकरच 'दबंगई- अ डिफरंट म्युझिकल स्टोरी' या रोमँटिक अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे. सुरजित सिंह राठोड हा तोच तरुण आहे, जो रिया चक्रवर्तीला सुशांतच्या ज्या हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम झाले होते, तेथील मॉर्चरीत घेऊन गेला होता. रियाने सुशांतच्या पार्थिवावर हात ठेवून 'सॉरी बाबू' म्हटल्याचा खुलासादेखील सुरजितनेच केला होता.
साजन अग्रवाल करत आहेत चित्रपटाचे दिग्दर्शन
सुरजितने सांगितल्यानुसार, तो आपल्या पदार्पणासाठी खूप उत्साही आहे. हा त्याचा पहिला चित्रपट असेल. या महिन्याच्या शेवटी तो शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक साजन अग्रवाल आहेत. सुरजितने या चित्रपटात त्याला ब्रेक दिल्याबद्दल साजन अग्रवाल यांचे आभार मानले आहेत. तसेच सहकार्यासाठी अभिनेता एजाज खानचेही त्याने आभार व्यक्त केले.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल चित्रपट
दबंगई या चित्रपटाती निर्मिती ज्ञानचंद देवपाठी यांची असून ते एसएसआर फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट घेऊन येत आहेत. सुरजित व्यतिरिक्त एजाज खान आणि पल्लवी सिंहदेखील या चित्रपटात
महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट राजस्थानी लव्ह स्टोरीवर आधारित असून सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाला केशव कुमार आणि छोटू सिंह यांचे संगीत आहे. जावेद हैदर,
राजकुमार कनौजिया आणि राजेश देसाई हे कलाकारदेखील या चित्रपट झळकणार आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.