आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sushant Singh Rajput Funeral Live; Sushant Singh Rajput Last Rites Mumbai Update | Last Rites Latest Updates From Mumbai Vile Parle Crematorium

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलविदा सुशांत:अनंतात विलीन झाला सुशांत सिंह राजपूत; श्रद्धा कपूर, राजकुमार राव, वरुण शर्मा, कृति सेननसह अनेक कलाकारांनी दिला आपल्या मित्राला अखेरचा निरोप

मुंबई10 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सुशांतच्या मामांनी न्यायालयीन चौकशीची तर माजी खासदार पप्पू यादव यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली
 • असे म्हटले जाते की, लॉकडाऊनमुळे सुशांत डिप्रेशनच्या उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकला नाही

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन झाला आहे. मुंबईतील विले पार्लेस्थित पवनहंस स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडले आहेत. सुशांतचे वडील केके सिंह, मोठी बहीण आणि चुलतभाऊ आमदार नीरज कुमार हे यावेळी हजर होते. 

अखेरचा निरोप द्यायला पोहोचले अनेक कलाकार   

सुशांतला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याचे जवळचे मित्र आणि टीव्ही कलाकार स्मशानभूमीत दाखल झाले होते. अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता अर्जुन बिजलानी हे येथे पोहोचले.

'छिछोरे' या चित्रपटात श्रद्धा कपूरने सुशांतसोबत काम केले होते.

याशिवाय या चित्रपटात त्याच्यासोबत काम करणारा अभिनेता वरुण शर्मादेखील आपल्या को-स्टारला अलविदा करायला पोहोचले.

दिग्दर्शक अभिषेक कपूर पत्नी प्रग्यासोबत स्मशानभूमीत दाखल झाले होते. अभिनेत्री कृति सेनन, विवेक ओबरॉय, रणवीर शौरी, उदित नारायण, सुनील शेट्टी, राजकुमार राव, रणदीप हुड्डा हेदेखील येथे पोहोचले.

मुंबईत पाऊस असूनदेखील स्मशानभूमीच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अलविदा करण्यासाठी गर्दी केली.

सुशांतची जवळची मैत्रीण रिहा चक्रवर्तीदेखील स्मशानभूमीत दाखल झाली होती. ती सोमवारी सकाळी कूपर हॉस्पिटलमध्ये जिथे सुशांतचे पार्थिव ठेवण्यात आले होते, तेथे देखील गेली होती.

रिहा चक्रवर्तीने कूपर हॉस्पिटलमध्ये जाऊन सुशांतचे अंत्यदर्शन घेतले होते.
रिहा चक्रवर्तीने कूपर हॉस्पिटलमध्ये जाऊन सुशांतचे अंत्यदर्शन घेतले होते.

14 जून रोजी सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 15 जून रोजी सकाळी त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेद झाले असून त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यात फास घेतल्यामुळे श्वास कोंडल्याने सुशांतचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तीन डॉक्टरांच्या टीमने सुशांतच्या मृतदेहाची ऑटोप्सी केली. त्यानंतर वांद्रे ठाण्यात त्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे. सुशांत सिंहने आत्महत्या केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत, अद्याप कोणतीही नोट मिळाली नसल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी सांगितले आहे. 

सुशांतचे चुलत भाऊ नीरज यांनी सांगितल्यानुसार, कुटूंबाला सुशांतवर पाटण्यात अंत्यसंस्कार करायचे होते, परंतु कोरोनामुळे प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही. 

सुशांतच्या कुटुंबातील 4 सदस्य पाटण्याहून मुंबईला पोहोचले आहेत. मुंबई एअरपोर्टबाहेर पडताना सुशांतचे वडील के.के सिंह (निळ्या टी-शर्टमध्ये). त्यांच्यासोबत सुशांतचे चुलत भाऊ नीरज कुमार बबलू (सफेद शर्टमध्ये) आहेत.
सुशांतच्या कुटुंबातील 4 सदस्य पाटण्याहून मुंबईला पोहोचले आहेत. मुंबई एअरपोर्टबाहेर पडताना सुशांतचे वडील के.के सिंह (निळ्या टी-शर्टमध्ये). त्यांच्यासोबत सुशांतचे चुलत भाऊ नीरज कुमार बबलू (सफेद शर्टमध्ये) आहेत.

अपडेट्स 

 • सुशांतच्या शवविच्छेदन अहवालानुसार, सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला. गळफास घेण्यासाठी त्याने कपड्याचा वापर केला होता. शरीरावर जखमा आढळल्या नाहीत.
 • सुशांतचे पार्थिव कुटुंबीयांना सोपवण्यात आले. त्याचे मेहुणे ओपी सिंह यांनी यासाठीच्या कागदपत्रांवर सही केली.
 • सुशांतचे चुलत भाऊ नीरज यांनी सांगितल्यानुसार, कुटुंबीय पाटण्यात त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी करु इच्छित होते, मात्र कोरोनामुळे प्रशासनाकडून त्यासाठी परवानगी मिळाली नाही.
मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर सुशांतचे वडील (मध्यभागी निळ्या टी-शर्टमध्ये) बेशुद्ध पडले होते. मुंबईसाठी निघताना त्यांना नातेवाईकांनी सहारा देऊन गाडीत बसवले होते.
मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर सुशांतचे वडील (मध्यभागी निळ्या टी-शर्टमध्ये) बेशुद्ध पडले होते. मुंबईसाठी निघताना त्यांना नातेवाईकांनी सहारा देऊन गाडीत बसवले होते.

अपडेट्स... 

 • पोलिसांनी कुटुंबीयांना सांगितले होते - विलेपार्ले किंवा वांद्रे येथे अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात. कुटुंबाला अंतिम निर्णय घ्यावा लागेल.
 • सुशांतची कोरोना चाचणीही करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

लॉकडाऊनमुळे तर तणाव वाढला नाही?

रविवारी सकाळी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये 34 वर्षीय सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही. पोलिसांना सुशांतच्या खोलीतून एक फाइल मिळाली असून त्यावरुन त्याच्यावर सहा महिन्यांपासून डिप्रेशनवर उपचार सुरू असल्याचे दिसून येते.  लॉकडाऊनमुळे तो आपल्या डॉक्टरांकडे उपचारांसाठी जाऊ शकला नसावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. सुशांतच्या मामांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जन अधिकार पक्षाचे नेते आणि माजी खासदार पप्पू यादव यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

उशीरा रात्री मित्राला आणि सकाळी बहिणीला फोन केला होता

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने शनिवारी रात्री 12:45 वाजता आपल्या एका अॅक्टर मित्राला फोन केला होता, पण त्याने फोन उचलला नाही. रविवारी सकाळी सुशांत उठला. सकाळी नऊच्या सुमारास त्याने ज्युस प्याला. त्यानंतर त्याने मुंबईतच राहणा-या आपल्या बहिणीला फोन केला आणि मग बेडरूममध्ये निघून गेला. दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास त्याच्या स्वयंपाकीने दुपारच्या जेवणासाठी अनेकदा दार ठोठावले. मोबाईलवर कॉल केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्याने सुशांतच्या बहिणीला फोन केला. बहीण आल्यानंतर चावीवाल्याला बोलावून बेडरूमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी सर्वांना सुशांतचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृतदेहाचा फोटो शेअर करणार्‍यांवर कारवाई केली जाईल

सुशांतच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने चेतावणी दिली आहे. सुशांतच्या मृतदेहाचे फोटो शेअर करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सायबर सेलच्या वतीने म्हटले गेले आहे.

भावाने सांगितले - नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सुशांतचे लग्न होणार होते 

सुशांतचा चुलत भाऊ नीरज यांनी सांगितल्यानुसार, हातात चित्रपण नसणे, हे त्याच्या आत्महत्येचे कारण असू शकत नाही. सुशांत आर्थिक संकटातून जात नव्हता. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुशांतचे लग्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...