आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला आणि अल्पावधीत आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार बनला. खरं तर त्याचे स्वप्न अभिनेता किंवा इंजिनिअर व्हायचे नव्हते. एका मुलाखतीत स्वतः सुशांतने याचा खुलासा केला होता. सुशांतची अंतराळवीर व्हायची इच्छा होती, परंतु कुटुंबामुळे त्याला अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावा लागला होता. परंतु अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात असताना त्याने शिक्षण अर्धवट सोडले आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत दाखल झाला होता.
सुशांतच्या वडिलांचा त्याचा अभिमान होता
मुलाखतीत सुशांत म्हणाला होता, "ही 2006 ची गोष्ट आहे, माझे कॉलेजमधील शेवटचे वर्ष होते, जेव्हा मी शिक्षण अर्धवट सोडण्याचा माझा निर्णय घरी सांगितला, तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. माझे वडील काहीच बोलले नाही, परंतु त्यांच्या मौनाला मी त्यांचा होकार समजला. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. वडिलांना माझा अभिमान वाटतो. जेव्हा ते फिरायला बाहेर पडतात, तेव्हा लोक त्यांना थांबवतात आणि माझ्या क्लिपिंग दाखवतात. त्यांना माझे यश बघून खूप आनंद होतो. 'बेटा, डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण कर', असे म्हणणे त्यांनी आता जवळजवळ बंद केले आहे.'
सुशांतला अंतराळवीर व्हायचे होते
सुशांत म्हणाला होता, "अभियांत्रिकी ही माझी निवड नव्हती. मला अंतराळवीर व्हायचे होते आणि नंतर एअर फोर्सचा पायलट. पण मला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा लागला होता, तेव्हा मी निराश झालो होतो. "
सुशांतला स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती मिळाली होती
सुशांतला स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती मिळाली होती, परंतु त्याने ती नाकारली आणि दुसरा मार्ग निवडण्याचे ठरवले. याविषयी सांगताना तो म्हणाला होता, "स्टॅनफोर्ड विद्यापीठात जाण्याऐवजी (जिथून मला शिष्यवृत्तीची ऑफर दिली गेली होती) मी महाविद्यालय सोडले आणि वर्सोवातील 1 आरके (रूम किचन) फ्लॅट भाड्याने घेतला, जिथे माझ्यासह आणखी सहा लोक भाड्याने राहायचे."
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.