आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या रहस्यमय मृत्यूमुळे त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती संशयाच्या भोव-यात सापडली आहे. सीबीआयने आज (28 जुलै) तिला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी रिया एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. इंडिया टुडेला दिलेल्या या मुलाखतीत रियाने तिच्यावर आतापर्यंत करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. रियाने सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर केले होते. ती सुशांतला त्यांना भेटू देत नव्हती, असा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर केला आहे.
या आरोपांवर रिया म्हणाली, 'मी सुशांतला त्याच्या कुटूंबाला भेटण्यापासून का थांबवणार होते? सुशांत 8 जून ते 13 जून या काळात त्याची बहीण मितूबरोबर होता. यावर्षी फेब्रुवारीमध्ये तो आपली मोठी बहीण आणि भावोजी ओपी सिंग यांना भेटला होता. तिघे एकत्र जेवायला गेले होते आणि त्याचे फोटो देखील पब्लिक डोमेनमध्ये आहेत. त्याआधी जानेवारीत तो चंदिगडला आपल्या बहिणीला भेटायला गेला होता, पण दोन दिवसांत तेथून परत आला होता. कदाचित तेथे त्याचे मन रमले नव्हते. तो स्वतःहून तेथून परत आला होता. तो परत आला आहे, हे मला देखील माहित नव्हते.'
रियाने मुलाखतीत सांगितले की, एकदा सुशांतची बहीण प्रियांकाने मद्यधुंद होऊन तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. सुशांतचे सुरुवातीपासूनच त्याच्या कुटुंबीयांसोबत चांगले संबंध नव्हते. जेव्हा जेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याला भेटायला येत असत, तेव्हा थोड्याशा वादानंतर लगेच निघून जात असतं.
रिया म्हणाली, 'जेव्हा मी आणि सुशांत वॉटरस्टोन रिसॉर्टमध्ये थांबलो होतो तेव्हा त्याच्या दोन बहिणी तिथे आल्या होत्या. मी दोन्ही बहिणी मीतू आणि प्रियांकाच्या पाया पडले, कारण सुशांतची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याला त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा हवा होता. सुशांत रडायचा आणि दोन महिन्यांपासून त्याच्या कुटुंबियांकडे त्याला येऊन भेटण्याची विनवणी करत होता. पण बहिणी आल्या आणि त्याला मदत न करता तेथून निघून गेल्या.'
रिया पुढे म्हणाली, 'सुशांतने मला सांगितले होते की वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. कारण वडिलांनी त्याला त्याच्या लहान वयातच सोडले होते. त्याला याबद्दल वाईट वाटायचे. मला भेटण्यापूर्वी सुशांत पाच वर्षे वडिलांना भेटला नव्हता. सुशांत त्याच्या आईच्या खूप जवळचा होता. सुशांतची आईदेखील नैराश्याला बळी पडली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला होता.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.