आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अद्भुत योगायोग:सुशांतच्या नावातच दडले होते त्याच्या आईचे नाव, चाहत्याने नावाचा अर्थ विचारल्यानंतर स्वत: सुशांतने केला होता खुलासा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या आईचे नाव उषा होते. त्यांचे 2002 साली निधन झाले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. तो त्यांच्या अतिशय जवळ होता. इतकेच नाही तर सुशांतच्या नावातच त्याच्या आईचेही नाव दडले होते. त्यामुळे त्याचे आपल्या नावावरही खूप प्रेम होते. याचा खुलासा स्वतः सुशांतने सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना केला होता. त्याचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होतोय.

स्क्रिनशॉटनुसार चाहत्याने सुशांतला त्याच्या नावाचा अर्थ विचारला होता. ज्याचे उत्तर देताना सुशांत म्हणाला होता, "याचा अर्थ काहीही ते सर्वकाही असा होतो. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या नावाच्या मध्यभागी म्हणजे हृद्यात माझ्या आईचे नाव म्हणजे 'उषा' (s'USHA'nt) आहे. काय अद्भुत गोष्ट आहे ना?', असे सुशांतने सांगितले होते.

  • अखेरच्या इंस्टा पोस्टमध्ये आईचे केले होते स्मरण

सुशांतने 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्याने आपले आयुष्य संपवले. मृत्यूच्या 11 दिवस आधी म्हणजे 3 जून रोजी त्याने इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. त्याने स्वतःचा आणि आईचा फोटो एकत्र करून इंस्टाग्रामवर टाकला होता. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले होते की, 'भूतकाळाच्या आठवणी अश्रूंवाटे वाहत आहेत. अपूर्ण स्वप्नं आणि उद्याची आशा या दोघांमध्ये आयुष्य वाटाघाटी करत आहे. #माँ', असा आशयाची त्याची ही पोस्ट होती. 

  • आईचा मृत्यू सर्वात दुःखद क्षण

सुशांतच्या आईचे 2002 मध्ये निधन झाले. जानेवारी 2016 मध्ये एका मुलाखती दरम्यान त्याने आईचा मृत्यू त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता, असे सांगितले होते. तो म्हणाला होता, 'ही एक भयानक भावना होती, जी अजूनही भीतीदायक आहे. जेव्हा यासारख्या गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला सर्वकाही क्षणिक असल्याचे दिसते. या घटनेने माझ्या आत काहीतरी बदलले. ती जाण्यापूर्वी मी जसा होतो, तसा आता नाहीये', असे सुशांतने सांगितले होते. 

बातम्या आणखी आहेत...