आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरणात नवीन दावा:दिशा सॅलियनच्या मृत्यूनंतर अधिकच बिघडली होती सुशांतची अवस्था, डिप्रेशनची औषधे घेणे केले होते बंद

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीडिया रिपोर्ट्समध्ये दिशा आणि सुशांतचे कनेक्शन जोडले जाऊ लागले होते, त्यामुळे तो अस्वस्थ राहू लागला होता.
  • सुशांतच्या स्टाफ आणि जवळच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, नकारात्मक बातम्यांचा त्याच्यावर खूप वाईट परिणाम झाला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवीन दावा समोर आला आहे. सुशांतला नैराश्याने ग्रासले होते आणि मृत्यूच्या काही दिवस आधी  त्याने औषधे घेणे बंद केले होते, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. आता रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येनंतर सुशांतची अवस्था अधिकच वाईट झाली होती.  

  • दिशाच्या निधनानंतर सुशांत अधिकच अस्वस्थ राहू लागला होता

 इंडिया टुडेने पोलिस सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, दिशा सॅलियनच्या मृत्यूच्या बातमीनंतर सुशांत अधिकच अस्वस्थ झाला होता. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सुशांतच्या दिशा सोबत असलेल्या असोसिएशनबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते.

9 जून रोजी दिशाने 14 व्या मजल्यावरून उडी मारली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता. यानंतर बर्‍याच मीडिया रिपोर्ट्समध्ये तिला सुशांतची माजी व्यवस्थापक म्हटले गेले होते. आधीच नैराश्याने झगडत असलेल्या सुशांतने हे सर्व ऐकले आणि त्याची प्रकृती अधिकच खराब झाली आणि त्याने औषधे घेणे बंद केले.

दिशा ही उदयसिंग गौरी यांच्या टॅलेंट मॅनेजमेंट फर्मची कर्मचारी होती आणि ती सुशांतचे काम बघत होती. पोलिसांनी उदय यांचाही जबाब नोंदवला आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, दिशा सुशांतला फक्त दोनदा भेटली होती.

  • पोलिस निगेटिव्ह स्टोरीच्या अँगलने तपास करत आहेत

सुशांतच्या स्टाफ आणि निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या विरोधात जेव्हा जेव्हा नकारात्मक बातम्या यायच्या तेव्हा त्याचा त्याच्यावर अतिशय वाईट परिणाम व्हायचा. पोलिस आता निगेटिव्ह स्टोरीच्या अँगलने तपास करत आहेत. जेणेकरुन सुशांतला एखाद्या विशिष्ट कॅम्प किंवा कंपनीने लक्ष्य तर केले नव्हते ना, याचा उलगडा होऊ शकेल. यासाठी पीआर व्यावसायिक आणि बॉलिवूडच्या बातम्यांवर काम करणा-या पत्रकारांचीही चौकशी केली जात आहे.

रेश्मा शेट्टी आणि शानू शर्मा यांच्यासह  बॉलिवूडमधील अनेक मोठे टॅलेंट आणि कास्टिंग मॅनेजर्स यांच्याकडेही चौकशी केली जात आहे. यासंदर्भात मंगळवारी चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. सुशांतच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी त्याच्यावर निगेटिव्ह आर्टिकल लिहिल्याचा आणि त्याच्या चित्रपटांना वाईट रिव्ह्यू दिल्याचा आरोप मसंद यांच्यावर आहे.