आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पिठानीचा आरोप - रियाविरूद्ध साक्ष देण्यासाठी सुशांतचे कुटुंबीय दबाव टाकत आहेत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार पोलिस मुंबईत या प्रकरणाशी संबंधित लोकांची चौकशी करत आहेत, सुशांतची बहीण आणि अंकिता लोखंडे यांची आतापर्यंत चौकशी झाली आहे
  • बिहारमध्ये दाखल झालेल्या एफआयआरचा तपास मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. आपल्यावरचे सर्व आरोप खोटे असल्याचे रियाने म्हटले होते. आता सुशांत मित्र आणि क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पिठानी याने रियाविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी सुशांतच्या कुटुंबीयांकडून दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात सिद्धार्थने वांद्रे पोलिसांना एक ईमेल केला आहे.

सिद्धार्थ पिठानीच्या ईमेलची प्रत
सिद्धार्थ पिठानीच्या ईमेलची प्रत

सिद्धार्थने मुंबई पोलिसांना केलेल्या ईमेलमध्ये केले गंभीर आरोप

  • सिद्धार्थने मुंबई पोलिसांना ईमेल पाठवला असून त्यात नमूद केल्यानुसार, सिद्धार्थला 22 जुलै रोजी एक कॉन्फरन्स कॉल आला होता. त्यात सुशांतचे मेहुणे आणि आयपीएस अधिकारी ओपी सिंह, मीतू सिंग (मोठी बहीण) आणि एक तिसरी व्यक्तीही होती. या कॉलमध्ये सिद्धार्थला सुशांतसोबत माऊंट ब्लँक सोसायटीत एका घरात राहत असताना रिया आणि सुशांत यांच्या खर्चाविषयी विचारणा करण्यात आली. हा कॉल 40 सेकंदात कट करण्यात आला. पण यात त्याची कोणताही जबाब नोंदवण्यात आला नाही, असे सिद्धार्थने सांगितले आहे.
  • त्यानंतर 27 जुलै रोजी सिद्धार्थला पुन्हा एकदा ओ.पी. सिंह यांचा फोन आला. त्यांनी सिद्धार्थला बिहार पोलिसांना रियाविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी सांगितले.
  • त्यानंतर पुन्हा एक कॉल आला. तो कॉल नीलोप्तल मृणाल नावाच्या व्यक्तीचा होता. ही तीच व्यक्ती आहे, जी बिहार पोलिसांसोबत दिसली होती. माझ्यावर अशा काही घटनांविषयी सांगण्यास दबाव आणला जातोय, ज्याविषयी मला काहीच माहित नाही, असे सिद्धार्थने आपल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.
  • बिहार पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांची चौकशी केली आहे सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी बिहार पोलिस सध्या मुंबईत आहेत आणि सुशांतशी संबंधित लोकांची चौकशी करत आहेत. यासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत सुशांतचा कुक, त्याची बहीण मीतू सिंह, एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्यासह 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. सुशांतच्या आत्महत्येच्या वेळी कुक घरीच उपस्थित होता. त्यानेच सुशांतच्या खोलीचे कुलूप तोडले होते.