आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतचा मॅसेज:मृत्यूच्या दिड वर्षानंतर आला सुशांत सिंहचा मॅसेज, चाहत्यांना बसला मोठा धक्का; नंतर वास्तव आले समोर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या फेसबुक अकाउंटवरुन एक मॅसेज आला आहे. नोटिफिकेशमध्ये सुशांत सिंह राजपूतचे नाव पाहताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. एकवेळी असे वाटले की, खरंत सुशांत आहे की काय? पण वास्तव मात्र वेगळेच होते. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने हा मॅसेज पाठवला होता. सुशांतची बहिण श्वेता हे फेसबुक खाते चालवत आहे. नववर्षाला सुशांत सिंह राजपूतच्या फेसबुकवर आलेल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, तुमची सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात. अशी पोस्ट नववर्षाला करण्यात आली होती.

बहिण श्वेता सिंह याची प्रतिक्रिया

नववर्षाला सुशांतच्या फेसबुक अकाउंटवरुन पोस्ट पडल्यानंतर त्याचे काही चाहते आनंदी झालेत. तर काही चाहते नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, "हे भगवान हे मी काय बघत आहे." तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, "ओह गॉड, माझ्या हृदयाची धडधड थांबली." तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, "एक सेंकदसाठी मला असे वाटले की, सुशांत वापस आला की काय. आतापर्यंत मला असे वाटते की, तो एक स्वप्न होते की काय! मात्र... सुशांत नेहमी आठवणीत राहील"

क्लोजर रिपोर्टसाठी चाहते प्रत्येक दिवशी सुशांतसाठी ट्रेंड चालवतात सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला. त्यानंतर त्याच्या मृत्यूप्रकरणी अनेक केंद्रीय तपास संस्थेने प्रकरणाचा तपास केला. मात्र आतापर्यंत कोणीही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल है बेचारा' त्याच्या मृत्यूनंतर OTT वर प्रदर्शित करण्यात आला होता. सुशांत सिंहला न्याय मिळवून देण्यासाठी त्याचे चाहते दररोज सोशल मीडियावर ट्रेंड चालवतात. चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, CBI सुशांत सिंह प्रकरणी क्लोजर रिपोर्ट जाहीर करावी.

बातम्या आणखी आहेत...