आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 35 व्या वाढदिवशी त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने सोशल मीडियावर एक भावनिक नोट शेअर केली आहे. सुशांतच्या बहिणीने त्याच्या वाढदिवशी खास स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात अॅस्ट्रोफिजिक्स शिकण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी 25.5 लाखांच्या स्कॉलरशिपची घोषणा तिने केली आहे. श्वेताने सांगितल्यानुसार, हे तिच्या भावाचे स्वप्न होते, जे आता पूर्ण होत आहे.
श्वेताने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंबंधी पोस्ट करत माहिती दिली आहे. सुशांतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण हा पुढाकार घेतल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांत सिंहची एक जुनी पोस्ट टाकत कॅलिफोर्निया विद्यापीठातील अॅस्ट्रोफिजिक्स विभागात 35 हजार डॉलरचा सुशांत सिंह राजपूत मेमोरियल फंड उभारण्यात आला आल्याचे सांगितले आहे.
अॅस्ट्रोफिजिक्समध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क साधावा. हे काम शक्य करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करते की तू जिथे असशील तिथे आनंदी असशील, अशी नोट श्वेताने लिहिली आहे.
सुशांतने आपल्या जुन्या पोस्टमध्ये काय लिहिले होते?
5 एप्रिल 2019 रोजी सुशांत सिंह राजपूतने एक पोस्ट शेअर केली होती. त्याने लिहिले होते, मी असे एक वातावरण निर्माण करायचे स्वप्न पाहिले आहे, जिथे भारतातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मोफत मिळेल. आणि सोबतच आपल्या कौशल्याचा विकास कण्यासाठीच्या गोष्टीही या मोफत मिळतील.
श्वेता म्हणाली - तू माझा भाग आहेस...
सुशांतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने त्याच्या नावे एक पोस्ट केली आहे. तिने सुशांत आणि कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिले, 'लव्ह यु भाई! तू माझा भाग आहेस आणि कायमच राहाशील…' #SushantDay हा हॅशटॅग तिने जोडला आहे.
गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांत मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. त्याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन प्रमुख एजन्सी करत आहेत. सुशांत अखेरचा दिग्दर्शक मुकेश छाबरांच्या 'दिल बेचार' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात संजना संघी त्याच्यासोबत झळकली होती. सुशांतच्या निधनानंतर हा चित्रपट त्यांच्या स्मृतीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सुशांत 'काय पो छे', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'पीके', 'केदारनाथ', 'सोनचिरिया' या गाजलेल्या चित्रपटांत झळकला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.