आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:अंकिता लोखंडेपासून विभक्त झाल्याचा सुशांतला झाला होता पश्चाताप,  पोलिसांच्या चौकशीदरम्यान डॉक्टरचा खुलासा 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकितासोबतचे नाते संपुष्टात आणल्याचा सुशांतला पश्चाताप झाला होता. सुशांत आणि अंकिता जवळजवळ सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पोलिस त्याच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान पोलिसांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, त्याची मॅनेजर आणि मानसोपचार तज्ज्ञाचीही चौकशी केली आहे. पोलिस चौकशीत सुशांतच्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, त्याला अंकितापासून वेगळे झाल्याचा पश्चाताप झाला होता.  

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, सुशांतचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. केसरी क्षेत्री यांनी पोलिस चौकशीत सांगितले की, सुशांतने अंकितापासून विभक्त होण्याबद्दल खेद व्यक्त केला होता. डॉ. म्हणाले, सुशांत गेल्या एक वर्षापासून नैराश्यात होता आणि त्याला रात्री झोप येत नव्हती. त्याला विचित्र विचार येत असतं. अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतरही सर्व काही ठीक होते, पण नात्यात सतत अपयशी ठरल्यानंतर त्याला समजले होते की, अंकितापेक्षा त्याच्यावर कोणीही जास्त प्रेम करू शकत नाही.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सुशांत क्रिती सेनॉननंतर एका दिग्दर्शकाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. परंतु दोन्ही नाते अपयशी ठरले होते. कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत सुशांतचे फारसे पटत नव्हते, दोघांची सतत भांडणे होत असल्याचे या वृत्तात म्हटले गेले आहे.

 रियाची पोलिसांकडून 9 तास चौकशी 

गुरुवारी दुपारी पोलिसांनी रिया चक्रवर्तीची कसून चौकशी केली. तब्बल नऊ तास तिची चौकशी झाली. यात रियाने सुशांतच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना सांगितले की त्याने यशराज फिल्म्सबरोबरचा करारा संपवला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाच्या प्रॉपर्टी डीलरने सांगितले होते की, वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न करणार होते, ज्यासाठी दोघे मुंबईत घर शोधत होते.

बातम्या आणखी आहेत...