आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अधु-या स्वप्नांची कहाणी!:सुशांत सिंहने गेल्यावर्षी  शेअर केली होती आपल्या 50 स्वप्नांची ड्रीम लिस्ट, विमान चालवणे ही होती पहिली इच्छा  

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • ट्रेनच्या माध्यमातून युरोप दौरा करायचा ही सुशांतची अखेरची इच्छा होती.

चित्रपटसृष्टीत अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रविवारी त्याने मुंबईतील वांद्रा येथील राहत्या घरी आत्महत्या केली. मागील सहा महिन्यांपासून  तो नैराश्याने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्विटरवर आपल्या स्वप्नांची एक यादी शेअर केली होती. यामध्ये त्याने आपल्या 50 स्वप्नांबद्दल सांगितले होते. 

14 सप्टेंबर 2019 रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुशांतने आपल्या 50 स्वप्नांबद्दल सांगितले होते.  त्याने लिहिले होते, 'माझी 50 स्वप्ने आणि मोजणी सुरुच आहे...' त्याच्या या ड्रीम लिस्टमध्ये विमान चालवणे ही त्याची पहिली इच्छा होती. तर ट्रेनच्या माध्यमातून युरोप दौरा करायचा ही त्याची अखेरची इच्छा होती. यातील काही त्याने पूर्णही केली हाेती

ही स्वप्ने पूर्ण न करताच कायमचा निघून गेला सुशांत 

 • विमान चालविण्याचं प्रशिक्षण
 • आयर्नमॅन ट्रायथलॉनचं ( स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग) प्रशिक्षण घेणे
 • डाव्या हाताने क्रिकेट खेळणे
 • मोर्स कोड ( टेलिकम्युनिकेशन लॅग्वेंज) शिकणे
 • अंतराळाविषयीची माहिती जाणून घेण्यास उत्सुक विद्यार्थ्यांना शिकवणे
 • चार टाळ्या वाजवून करण्याची पुशअप्स स्टाइल
 • एक हजार झाडे लावणे
 • दिल्ली कॉलेजच्या वसतिगृहात एक संध्याकाळ घालवणे
 • कैलास पर्वतावर बसून ध्यानधारणा करणे
 • एक पुस्तक लिहिणे
 • सहा महिन्यांत सिक्स पॅक अ‍ॅब्स बनविणे
 • एक आठवडा जंगलात राहणे
 • ज्योतिषशास्त्राचा अभ्साय करणे
 • किमान 10 नृत्य प्रकार शिकणे
 • शेती करणे शिकणे
 • गिटारवर आवडती 50 गाणी वाजवणे
 • एका लॅम्बोर्गिनीचा मालक होणे
 • स्वामी विवेकानंदांवर माहितीपट बनवणे
 • व्हिएन्नामधील सेंट स्टीफन्स कॅथेड्रलला भेट देणे
 • कॅपोइरा (अफ्रो-ब्राझिलियन मार्शल आर्ट्स) शिकणे
 • रेल्वेमार्गे युरोप प्रवास करणे
 • नासाच्या वर्कशॉपमध्ये भाग घेणे
 • अंटार्क्टिकाला जाणे
 • खेळाडूंसोबत बुद्धिबळ आणि टेनिस खेळणे
 • ब्लू होलमध्ये पोहणे
 • अॅक्टिव्ह व्होल्कॅनोचा फोटो काढणे
0