आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री रिया चक्रवर्ती लवकरच 'रोडीज सीझन 19' द्वारे टीव्हीवर कमबॅक करत आहेत. 10 मार्च रोजी रियाने शोचा एक प्रोमो शेअर करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. शोच्या प्रोमो व्हिडिओत रिया म्हणाली, 'तुम्हाला काय वाटलं… मी परत नाही येणार?… मी घाबरले?… आता घाबरण्याची वेळ दुसऱ्यांची आहे.' यात ती अॅक्शन करताना दिसली. या सीझनमध्ये रियाची ओळख गँगलीडर म्हणून करुन देण्यात आली आहे. रियाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण प्रियांकाने केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली आहे.
प्रियांकाने केले आक्षेपार्ह ट्वीट
सुशांतच्या बहिणीने ट्वीट करत "तू का घाबरशील? तू तर वेश्या होतीस, आहेस आणि राहशील. प्रश्न हा आहे की तुझे उपभोगता कोण आहेत? कोणीतरी सत्ताधारीच अशी हिंमत दाखवू शकतो. सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये होणाऱ्या विलंबासाठी कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट झालं आहे," असे म्हटले आहे.
मी कोणाचेही नाव घेतलेले नाही - प्रियांका नंतर प्रियांकाने तिच्या या ट्वीटवर स्पष्टीकरण दिले आणि लिहिले. ती म्हणाली, 'मी स्पष्ट करु इच्छिते की, मी केलेले ट्विट कोणत्याही माणसाला लक्ष्य करण्यासाठी केलेले नाही. माध्यमांनी ते चुकीचे दाखवले आहे. त्यामुळे माझ्या ट्वीटचा चुकीचा अर्थ काढला गेला,' असे ती म्हणाली.
सुशांतच्या मृत्यूसाठी कुटुंबाने रियाला धरले जबाबदार
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा मुंबई पोलिसांपासून सीबीआय, ईडी आणि एनसीबीनेही तपास केला. 2020 मध्येच एनसीबीने सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक केली होती. याकाळात रियाने जवळपास एक महिना मुंबई तुरुंगात काढला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये तिला जामीन मिळाला. सुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबाने रिया चक्रवर्तीला जबाबदार धरले आहे. त्यांनी तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.