आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Sister Remembers Him And Writes It Has Been A Month Since You Left Us...but Your Presence Is Still Felt So Strongly.... Love You Bhai... Hope U Always Stay Eternally Happy.

आठवणींमध्ये अभिनेता:सुशांतला जाऊन एक महिना झाला पूर्ण, बहिणीने लिहिले - तुझ्या अस्तित्वाची जाणिव आम्हाला अजूनही होते 

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशात सिंह राजपूतला जाऊन मंगळवारी 14 तारखेला एक महिना झाला. या प्रसंगी त्याची मोठी बहिण श्वेता सिंह कीर्तीने त्याची आठवण काढत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या माध्यमातून ती म्हणाले आहे की, अजूनही सुशांतच्या अस्तित्वाची जाणिव होते.

सुशांतसोबत आपला एक फोटो शेअर करत श्वेताने लिहिले की, 'तु आम्हाला सोडून जाऊन एक महिना झाला आहे... पण अजूनही तुझ्या अस्तित्वाची जाणिव होते... लव्ह यू भाई... आशा आहे की, तु नेहमी खूश राहशील'

4 जुलैला शेअर केले होते सुशांतने लिहिलेले लेटर 

View this post on Instagram

❤️❤️❤️

A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on Jul 4, 2020 at 8:22am PDT

सुशांत आपल्या भाचीसोबत 

सोशल मीडियावर परतली अंकिता लोखंडे, सुशांतच्या आठवणीत देवासमोर दिवाल लावून फोटो केला शेअर 

सुशात सिंह राजपूतच्या मृत्यूला 14 जुलैला एक महिना पूर्ण झाला. सुशांतच्या मृत्यूने त्याची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही दु: खी आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर ती सोशल मीडियावर अजिबात दिसत नव्हती. मात्र आता एक महिन्यानंतर ती पुन्हा सोशल मीडियावर परतली आहे. अंकिताने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या घरातील मंदिराचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गणपती आणि साई बाबांची मूर्ती दिसतेय. यासमोर तिने दिवा लावलेला दिसतोय. अंकिताने हा दिवा सुशांतच्या आठवणीत लावला आहे. अंकिताने आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव मेंशन केलेले नाही. परंतु तिने  'चाइल्ड ऑफ गॉड' म्हणजे 'देवाचे मुलं' असे लिहिले आहे. 

View this post on Instagram

CHILD Of GOD 😇

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Jul 13, 2020 at 8:15pm PDT