आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कुटुंबीयांची न्यायाची मागणी:सुशांतची मोठी बहीण श्वेताने भावासाठी केली न्यायाची मागणी, सांगितले सीबीआय चौकशीची मागणी न करण्यामागचे कारण

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • #जस्टिसफॉरसुशांतसिंहराजपूत असे श्वेताने म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर सुशांतची मोठी बहीण श्वेताने पहिल्यांदाच आपल्या दिवंगत भावासाठी न्यायाची मागणी केली आहे. मंगळवारी उशीरा रात्री तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि त्यासह #जस्टिसफॉरसुशांतसिंहराजपूत असे लिहिले.

अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या श्वेता सिंह कीर्तीने आपल्या पोस्टमध्ये सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले, 'जर सत्याला किंमत नसेल, तर मग कधीच काहीही होणार नाही.' सोबतच तिने ##जस्टिसफॉरसुशांतसिंहराजपूत हा हॅशटॅग वापरला.

 • श्वेताने सांगितले- कुटुंबीय का करत नाहीये सीबीआय चौकशीची मागणी

सुशांतचे निधन झाल्यानंतर त्याची बहीण श्वेता सिंह किर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा सुशांतविषयीच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यात अनेक वेळा चाहते तिला सुशांतविषयी, त्याच्या आत्महत्येविषयी प्रश्न विचारत असतात. सुशांतच्या एका चाहत्याने ‘सुशांतचे कुटुंबीय सीबीआय चौकशीची मागणी का करत नाहीत?’, असा प्रश्न विचारला. त्यावर श्वेताने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. “आम्ही मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होण्याची आणि रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहोत”, असे उत्तर श्वेताने दिले आहे.

 • सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरुद्ध केली तक्रार

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पाटणा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर आता रियावर अटकेची टांगती तलवार आहे. बिहार पोलिसांचे एक पथक सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. या प्रकरणी रियासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन मॅनेजर सौमियल मिरांडा आणि श्रुती मोदी यांच्या नावांचा समावेश आहे.

 • या कलमांखाली गुन्हा दाखल

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात कलम 341, 342, 280, 420, 406, 420 आणि 306 अंतर्गत रिया, तिचे आईवडील आणि भावासह दोन मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी पाटणा पोलिस रियाची चौकशी करण्यासाठी तिच्या मुंबईतील घरी पोहोचले होते. मात्र तिथे रिया किंवा तिच्या कुटुंबातील कुणीही हजर नव्हते.

एफआयआरमध्ये सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर 7 आरोप केले आहेत:

 • 2019 पूर्वीपर्यंत सुशांतला कोणताही मानसिक आजार नव्हता. रियाच्या संपर्कात आल्यावर अचानक मानसिक आजार कसा झाला?
 • जर तो उपचार घेत असेल तर मग आमच्याकडून लेखी किंवा तोंडी मान्यता का घेतली गेली नाही, जी आवश्यक असते?
 • सुशांतवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी कोणती औषधे दिली होती, ते देखील या कटात सामील आहेत का?
 • सुशांतची मानसिक स्थिती गंभीर असताना रियाने त्याला योग्य वागणूक का दिली नाही, ती त्याचे मेडिकल कागदपत्रं आपल्यासोबत का घेऊन गेली?
 • सुशांतच्या बँक खात्यात 17 कोटी रुपये होते, त्यापैकी एका वर्षामध्ये सुमारे 15 कोटी रुपये काढण्यात आले, हे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले?
 • सुशांतने बॉलिवूडमध्ये नाव कमावले होते. मग अचानक असे काय झाले की रियाच्या येणा-यानंतर त्याला चित्रपट मिळणे बंद झाले?
 • सुशांत त्याचा मित्र महेशसोबत मिळून केरळमध्ये ऑर्गेनिक शेतीसाठी जमीन पाहात होता, तेव्हा रियाने त्याला ब्लॅकमेल केले?