आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Sister Shweta Points Out Twitter Crashed And Says A True Revolution In All Sense : 2 Million Tweets...#Revolution4SSR That’s OUR UNITY!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाहत्यांनी सुरु केले #Revolution4SSR अभियान:20 लाखांहून अधिक ट्विट झाल्याने क्रॅश झाली मायक्रोब्लॉगिंग साइट, सुशांतची बहीण श्वेताने लिहिले - ही खरी क्रांती आहे

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाहत्यांनी मोठ्या संख्येने ट्विट्स केल्याने ट्विटर थोड्या काळासाठी क्रॅश झाले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या चौकशी दरम्यान त्याची थोरली बहीण श्वेता सिंह किर्तीने हिने चाहत्यांना #Revolution4SSR ही मोहीम राबवून चाहत्यांना त्याचे समर्थन करण्यास सांगितले होते. या मोहिमेला मिळालेल्या पाठिंब्यामुळे खूश झालेल्या श्वेताने सांगितले की, चाहत्यांनी मोठ्या संख्येने ट्विट्स केल्याने ट्विटर थोड्या काळासाठी क्रॅश झाले होते.

गुरुवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये श्वेताने लिहिले की, 'ट्विटर थोड्या काळासाठी क्रॅश झाल्याचे समजले... हे सत्य आहबेे आणि न्यायासाठी एकत्रितपणे लढा देणा-यांचा हा आवाज आहे ... ही प्रत्येक अर्थाने खरी क्रांती आहे. ही पुढेही सुरू ठेवा. आमची शक्ती एकवटली आहे. # Revolution4SSR'

आतापर्यंत 20 लाखांहून अधिक ट्विट्स
सुशांतच्या निधनानंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आलेले वकील इशकण सिंह भंडारी यांनी शुक्रवारी सकाळी या मोहिमेबद्दल आपल्या ट्विटमध्ये म्हटले लिहिले की, #Revolution4SSR साठी काल 20 लाखा ट्विट्स झाले. पीआर अयशस्वी झाला कारण आपण पुन्हा एकदा गर्जना केली.'

यापूर्वी गुरुवारी रात्री आपल्या ट्विटमध्ये भंडारी यांनी लिहिले होते की, '22 जुलै रोजी पहिली डिजिटल मोहीम #Candle4SSR होती, दुसरी डिजिटल मोहीम 7 ऑगस्ट रोजी #Warriors4SSR ही होती. पण आम्ही थकलो नाही किंवा थांबलो नाही. आणि आम्ही पैसे घेऊन पीआर करत असलेल्या लोकांना आमचे ऐक्य दाखवले आहे. #Revolution4SSR या तिसर्‍या डिजिटल मोहिमेसाठी आतापर्यंत 1.52 मिलियन ट्विट झाले आहेत. यात इंस्टा / फेसबुक पोस्टचा समावेश नाही.'

सुशांतच्या मृत्यूप्रकरणात सीबीआय कलम 302 जोडू शकते

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय आता या प्रकरणात भादंवी (हत्या) कलम 302 जोडण्याचा विचार करत आहे. एम्सच्या पथकाने आपला तपास अहवाल सादर केला असून त्यानंतर सीबीआय या प्रकरणातील दुसर्‍या टप्प्यात चौकशी सुरू करणार आहे. याशिवाय सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानी हा सरकारी साक्षीदार होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...