आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतच्या खर्चाबाबत दावाः:सुशांतच्या बँक खात्यातून 10 महिन्यांत 4.6 कोटी रुपये खर्च झाले होते, रिया आणि तिचा भाऊ शोविकचाही खर्च उचलत होता

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतने रिया आणि तिच्या भावावर एका खात्यातून 9.5 लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला जात आहे.
  • सुशांतने प्रवास, पर्सनल लग्झरी, चॅरिटी आणि धार्मिक गोष्टींमध्ये हे पैसे खर्च केले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीत सीबीआयने शुक्रवारी रिया चक्रवर्तीची सुमारे 10 तास कसून चौकशी केली. शनिवारी पुन्हा रियाला बोलावण्यात आले आहे. दरम्यान, सुशांतच्या बँक खात्याचा तपशील समोर आल्याचा दावा केला जातोय. रिपोर्ट्सनुसार एका खात्यातील आर्थिक व्यहारांचे विश्लेषण केल्यानंतर सुशांतने दहा महिन्यांतच 4.6 कोटी रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे.

  • हे पैसे कुठे खर्च केले?

इंडिया टुडेने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, सुशांतने प्रवास, पर्सनल लग्झरी, घरी काम करणा-या सदस्यांना मदत, दान आणि आध्यात्मिक कार्यात सर्वाधिक पैसे खर्च केले आहेत. जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान या खात्यातून एकूण 4.6 कोटी रुपये खर्च झाले. या पैकी सहलींवर 42 लाख रुपये खर्च झाले. पावना (महाराष्ट्र) फार्महाऊसवर 33 लाख रुपये खर्च झाले तर सुशांतच्या पर्सनल लग्झरीवर 1.1 कोटी रुपये खर्च झाले.

  • रियावर किती खर्च झाला?

बँक खात्यातील तपशीलावरुन असेही दिसून आले की, बरेच पैसे रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्यावरही खर्च झाले आहेत. दहा महिन्यांच्या बँक स्टेटमेंटनुसार या एका खात्यातून रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्यावर 9.5 लाख रुपये खर्च झाले. त्यापैकी 1.7 लाख रुपये किंमतीचे फ्लाइट तिकिट आहेत. शोविकच्या हॉटेल स्टेसाठी 4.72 लाख रुपये आणि 3.4 लाख रुपये खरेदी आणि मेकअपवर खर्च झाले.

  • मी सुशांतच्या पैशांवर जगत नव्हते : रिया

आज तकला दिलेल्या मुलाखतीत रियाने मी सुशांतच्या पैशांवर जगत नव्हते, असे म्हटले आहे. रिया म्हणाली होती, "त्याला (सुशांतला) स्टार सारखे जगायला आवडायचे आणि ती त्याने निवडलेली लाइफस्टाइल होती. आम्ही कपल प्रमाणे राहायचो", असे ती म्हणाली होती. पण सोबतच यूरोप टूरचा संपूर्ण खर्च सुशांतने केल्याचे तिने मान्य केले होते. ''पॅरिसमध्ये माझे एक शूट होते. तिथे एक फॅशन शो होता. त्या फॅशन शो साठी मला पॅरिसला बोलावण्यात आले होते. कंपनीने माझे बिझनेस क्लासचे तिकिट काढले होते आणि तिथे माझी राहण्याची व्यवस्था केली होती'', असे रियाने या मुलाखतीत सांगितले होते. ती पुढे म्हणाली होती, ''माझ्या पॅरिस दौऱ्याच्या निमित्ताने युरोप ट्रीप करता येईल ही सुशांतची कल्पना होती. सुशांतने ते तिकिट रद्द केले आणि फर्स्ट क्लासचे तिकिट काढले. उर्वरित संपूर्ण ट्रीपमध्ये सुशांतने हॉटेलचे पैसे भरले. त्याची इच्छा होती. मला काही आपत्ती नव्हती. तो स्टारसारखा राहत होता. तो जे पैसे खर्च करतोय त्यावर मला आक्षेप होता'', असे रिया म्हणाली होती

  • सीएने रियाच्या बँक खात्यात व्यवहार झाल्याचे नाकारले होते

गेल्या महिन्यात सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनीही दावा केला होता की, सुशांतच्या खात्यातून रियाच्या खात्यात कोणतीही मोठी रक्कम ट्रान्सफर झाली नव्हती. ते म्हणाले होते, "रियाच्या खात्यात काही हजारांशिवाय कोणतीही मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली नव्हती. एकदा रियाच्या आईने सुशांतच्या खात्यात 33 हजार रुपये ट्रान्सफर केले. कारण तो फिल्मस्टार होता आणि आपली जीवनशैली सांभाळावी लागायची. दोघांनी (सुशांत आणि रिया) एकत्र प्रवास केला आणि तो आपल्या इच्छेनुसार आयुष्य जगला."

  • आणि ही आहे रियाची 15 कोटी रुपयांची कहाणी

सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. जेव्हा रियाला याबद्दल विचारणा केली गेली तेव्हा तिने सांगितले की, सुशांतची निर्माता वाशू भगनानी आणि दिग्दर्शक रूमी जाफरी यांच्यासोबत एका चित्रपटाची डील झाली होती. यासाठी त्याला 15 कोटींची ऑफर देण्यात आली होती. पण हा फक्त तोंडी करार होता.

रिया म्हणाली, "सुशांत यामुळे खूप आनंदी होता. ही डील फेब्रुवारीमध्ये झाली होती. त्यावेळी सुशांत त्याची बहीण आणि भावोजी ओ.पी.सिंह यांंना भेटला होता. तेव्हा सुशांतने त्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. पण चित्रपटासंदर्भात ऑन पेपर काहीही झाले नव्हते. हा तोंडी करार होता, ज्यातून प्रत्येकजण खूश होता. पण लॉकडाऊनमुळे चित्रपट पुढे ढकलला गेला आणि पुढे त्यांच्यात पैशांचा व्यवहार होऊ शकला नाही."