आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी:सुशांत सिंह राजपूतचा ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ पुन्हा थिएटरमध्ये होतोय प्रदर्शित, 'हे' आहे कारण

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा गाजलेला 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ हिंदीत नव्हे तर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. नीरज पांडे दिग्दर्शित महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 2016 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात सुशांतने महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती.

12 मे रोजी होतोय प्रदर्शित
'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट येत्या 12 मे रोजी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

सुशांत सिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. भारतीय क्रिकेट कर्णधार धोनीच्या जीवनावर आधारित, 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'ला जगभरातील भारतीय चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले होते. आता सात वर्षांनी पुन्हा एकदा धोनीचे आयुष्य आणि दिवंगत सुशांतचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. क्रिकेटच्या जादुई क्षणांचा आनंद चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा लुटता यावा, हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यामागचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसह कियारा अडवाणी, दिशा पाटनी, अनुपम खेर आणि भूमिका चावला यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सुशांतचे चाहते हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करतील, असे म्हणायला हरकत नाही.