आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर सोमवारी मुंबईतील विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्याप त्याच्या आत्महत्येमागील खरे कारण समोर आलेले नाही. आत्महत्येपूर्वी सुशांतने दोन लोकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला होता. पण या दोन्ही व्यक्तींसोबत सुशांतचे बोलणे होऊ शकले नव्हते. रविवारी आत्महत्येपूर्वी सुशांतने त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि महेश शेट्टी या फोन केला होता. परंतु, या दोघांनाही त्याचा कॉल रिसिव्ह केला नव्हता.
सुशांतच्या नैराश्याविषयी महेश म्हणाला...
या संपूर्ण प्रकरणात रियाकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर ‘पवित्र रिश्ता’मधील सुशांतचा को-स्टार राहिलेल्या अभिनेता महेश शेट्टीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार सुशांत हा त्याच्या भावासारखा होता आणि या घटनेमुळे त्याला जबर मानसिक धक्का बसला आहे. फोन कॉलबद्दल महेशने बोलणे टाळले, पण सुशांतच्या डिप्रेशनविषयीची एक हैराण करणारी गोष्ट त्याने सांगितली.
सुशांतने औषध घेणे बंद केले होते
इंडिया फोरमच्या वृत्तानुसार, महेशने सांगितले की, सुशांतने गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनची औषधे घेणे बंद केले होते. सुशांतच्या घरी काम करणा-या सदस्याने याची माहिती महेशला दिली होती. जेव्हा महेशने सुशांतला औषधे घेणे का बंद केली असा प्रश्न केला होता, त्यावर आता मला या औषधांची गरज नाही, असे उत्तर दिले होता. सोबतच आता काळजी करण्याची काहीच गरज नाही, असेही म्हटले होते.
मीडियाला केले आवाहन
महेश शेट्टी च्या टीमने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले असून मीडियाला त्याच्याशी सुशांतबद्दल प्रश्न विचारू नका अशी विनंती केली आहे. कारण महेशसाठी हा खूप कठीण काळ आहे. निवेदनात म्हटले आहे की, "सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने आपल्या सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. महेश शेट्टीने त्याचा भाऊ, मित्र गमावला आहे. त्याला या दुःखातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्या."
View this post on InstagramA post shared by Mahesh Shetty (@memaheshshetty) on Jun 14, 2020 at 10:16pm PDT
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.