आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली:बिहारमधील चौक आणि रस्त्याला सुशांतचे नाव, सीबीआय चौकशीसाठी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले 

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याचे चाहते  आपापल्या पद्धतीने आदरांजली वाहात आहेत. अलीकडेच त्याच्या पूर्णिया या गावातील एका चौक आणि रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. महापौर सविता सिंह यांनी मनपाच्या वतीने सुशांतला श्रद्धांजली वाहिली आणि फोर्ड कंपनी चौकाचे नाव बदलून सुशांत सिंह राजपूत चौक केले. याशिवाय मधुबनी चौक ते माता चौक या मार्गाचे नाव सुशांत सिंह राजपूत पथ असे करण्यात आले आहे.

 • सोशल मीडियावर फोटो-व्हिडिओ व्हायरल 

यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लोक चौकात सुशांत सिंह राजपूत चौक नावाच्या पट्टीचे अनावरण करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावरील फलकाचा फोटोही सोशल मीडियावर समोर आला आहे, त्यावर सुशांत सिंह राजपूत पथ असे लिहिलेले आहे.

 • सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली

सविता सिंह यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी बिहार व भारत सरकारकडे केली आहे. त्यांनी सीएम नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून त्या पत्रात म्हणाल्या, "भारत आणि बिहार सरकारवर माझा पूर्ण विश्वास आहे की सरकार नक्कीच सीबीआय चौकशीला परवानगी देईल."

आतापर्यंत प्रकरणात काय झाले

 • 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होते. सुशांतचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला असल्याचे पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात स्पष्ट झाले आहे.
 • पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट अद्याप मिळालेली नाही.  मात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन आणि त्याच्या घरात मिळालेल्या औषधांवरुन तो डिप्रेशनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु अद्याप आत्महत्येमागील खर्‍या कारणापर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत.
 • आतापर्यंत या प्रकरणी 34 जणांची चौकशी झाली आहे. यामध्ये सुशांतचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. 
 • यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवला आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल. शानू शर्मा यांना पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावले जाऊ शकते.
 • याशिवाय चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी ईमेलद्वारे आपला जबाब पोलिसांना पाठवला आहे. 
 • अभिनेत्री कंगना रनोटचीही पोलिस चौकशी करू शकतात. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीही काहीसे असेच संकेत दिले होते.  
 •  सुशांतच्या जागी रणवीर सिंगची चित्रपटात कास्ट केल्यावरुन  सोमवारी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळींची 3 तास चौकशी केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात त्यांना 30 प्रश्न विचारले गेले. भन्साळी म्हणाले की, सुशांतने स्वतः त्यांचा चित्रपट सोडला होता.
 • दरम्यान, राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामींनी वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक ईशकरण सिंह भंडारी यांना या प्रकरणातील तथ्यांची चौकशी करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करणे योग्य आहे की नाही हे त्यांना समजू शकेल.
0