आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:रिया चक्रवर्तीने गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली सीबीआय चौकशीची मागणी,  म्हणाली - मी सुशांतची गर्लफ्रेंड तुम्हाला हात जोडून विनंती करते 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाच्या ट्विटनुसार, तिला जाणून घ्यायचे आहे की, सुशांतने कोणाच्या दबावामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले

सुशांत सिंह राजपूत सुसाइड केसमध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्यांमध्ये आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नावही जोडले गेले आहे. रियाने यासंदर्भात ट्विट केले आहे. गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात दखल देण्याची मागणी केली आहे. ट्विटमध्ये तिने स्वतःला स्पष्टपणे सुशांतची गर्लफ्रेंड असे संबोधले आहे. 

रियाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- आदरणीय अमित शाह सर. मी सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती. त्याच्या अकस्मात निधनाला एक महिना उलटून गेला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. न्यायाच्या हितासाठी मी हात जोडून या प्रकरणात सीबीआय चौकशीची विनंती करते. मला फक्त हे समजून घ्यायचे आहे की सुशांतवर असा काय दबाव होता ज्यामुळे सुशांतने हे पाऊल उचलले.

बुधवारी  सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान पीएम मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पत्रात लिहिलेले- मला खात्री आहे की सुशांतच्या अकाली मृत्यूबद्दल तुम्हाला माहिती असेलच. सुशांतच्या कथित आत्महत्येच्या कारणांची माहिती माझे वकील ईशकरण भंडारी यांनी घेतली आहे. मात्र, एफआयआर नंतर पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत. मला माझ्या सूत्रांकडून कळले आहे की दुबईच्या डॉनच्या संपर्कातील फिल्म इंडस्ट्रीचे अनेक मोठे नावं सुशांतचा मृत्यू आत्महत्या आहे हे दाखवण्यासाठी पोलिसांवर प्रेशर टाकत आहे.

मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा की, त्यांनी सुशांतच्या खटल्याची सीबीआय चौकशी करण्यासाठी त्यांनी तयार राहावे. लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणे आवश्यक आहे. मला विश्वास आहे की तुमच्या सल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सीबीआय चौकशीसाठी तयार असतील.