आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांना सवाल - 4 वर्षांत सुशांतच्या खात्यात 50 कोटी रुपये जमा झाले आणि ते सर्व पैसे काढले गेले; हा तपासासाठी महत्त्वपूर्ण विषय नाही का?

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय म्हणाले की, आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मुंबई पोलिसांना याबद्दल प्रश्न विचारणार.
 • मुंबईला पाठविण्यासाठी डीआयजी मनु महाराज, एटीएस डीआयजी विकास वैभव आणि एसटीएफ डीआयजी विनय कुमार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
 • रविवारी पाटण्यातील एसपी विनय तिवारी हे विमानाने मुंबईत दाखल झाले. मात्र कोरोना नियमांचा हवाला देत बीएमसीने त्यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वारंटाइन ठेवले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करत नसल्याचा आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी केला आहे. गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यातून तब्बल 50 कोटी रुपये काढले गेले आणि फक्त गेल्या वर्षभरात 15 कोटी रुपये काढल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना पांडेय म्हणाले - 'गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यात 50 कोटी रुपये जमा केले गेले आणि आश्चर्यकारकरित्या ते सर्व पैसे खात्यातून काढले गेले. एका वर्षात 17 कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा केले गेले. त्यापैकी 15 कोटी रुपये काढले गेले. हा तपासासाठी महत्त्वपूर्ण विषय नाही का? आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मुंबई पोलिसांना याबद्दल प्रश्न विचारणार', असे ते म्हणाले आहेत.

 • दुसरीकडे डीआईजी स्तरीय अधिका-यांना मुंबईत पाठवण्याची तयारी

या प्रकरणात बिहार आणि मुंबई पोलिसांमधील तणाव वाढतच चालला आहे. पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना सक्तीने क्वारंटाइन करण्यात आल्यानंतर आता बिहार सरकार डीआयजी-स्तरीय अधिकारी मुंबईला पाठविण्याची तयारी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंगेरहून डीआयजी मनु महाराज, एटीएस डीआयजी विकास वैभव आणि एसटीएफ डीआयजी विनय कुमार यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. सर्व काही जुळून आल्यास हे तीन सुपर कॉप मुंबईला जाऊन सुशांतच्या मृत्यूचे रहस्य सोडवतील.

 • यावेळी अधिकारी रोडमार्गे येतील

पाटण्याचे एसपी विनय तिवारी हे विमानाने मुंबईत दाखल झाले आणि बीएमसीने कोरोना नियमांचे कारण सांगून 15 ऑगस्टपर्यंत त्यांची क्वारंटाइन केले. याचा धडा घेत या वेळी अधिका-यांना रोडमार्गे पाठविण्याची तयारी सुरू आहे. नियुक्त करण्यात आलेले अधिकारी सुरक्षेच्या निकषांनुसार मुंबईला रवाना होतील असे सांगण्यात येत आहे.

 • विनय तिवारी यांनी क्वारंटाइन करण्यात आल्याने नाराजी

विनय तिवारी यांना सक्तीने क्वारंटाइन करण्यात आल्यापासून बिहारच्या पोलिस विभागात संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मते, तिवारी यांनी मुंबईला पोहोचण्यापूर्वी तेथील पोलिसांना अधिकृतपणे माहिती दिली होती. असे असूनही, ज्या प्रकारे त्यांना कोरोना नियमांचा हवाला देऊन क्वारंटाइन करण्यात आले, त्यावरुन मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याचे दिसते.

 • चौकशी प्रभावित केल्याचा आरोप

मुंबई पोलिसांनी विनय तिवारी यांना सक्तीने क्वारंटाइन केले आणि आता ते आणि बीएमसी सध्या मुंबईत अंडरग्राऊंड असलेल्या एसआयटी (विशेष तपास पथक) कडे लक्ष ठेवून आहेत.पालिकेचे पथक बिहार पोलिसांच्या विशेष पथकाचा शोध घेत आहे, जेणेकरुन तपासाची दिशा बदलली जाईल. सोमवारी दिवसभर पाटण्याहून मुंबईत दाखल झालेल्या पोलिसांच्या विशेष पथकाचा शोध घेतला गेला. मुंबई पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये त्यांचा शोध घेण्यात आला.

 • पाटण्याच्या आयजींनी बीएमसी आयुक्तांना पत्र लिहिले

हे सर्व मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरुन घडत असल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे. जेणेकरुन पाटणा पोलिस त्यांचा तपास पूर्ण करू शकणार नाहीत. पाटण्याचे आयजी संजय सिंह यांनी बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून एसपी तिवारी यांना सोडण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, पोलिस अधिका-याला असे क्वारंटाइन ठेवणे योग्य नाही. आमच्या सरकारच्या वतीने डीजीपींनी सर्व सूचना दिल्या आहेत. बिहारचे डीजीपी स्वत: तेथील डीजीपीशीही बोलतील.

25 जुलैपासून ते आतापर्यंत सुशांत केसमध्ये काय घडले?

 • 25 जुलै रोजी सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरूद्ध त्यांच्या मुलाची फसवणूक करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन​​​​​रियाविरुद्ध पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी आरोप लावला की, सुशांतच्या बँक खात्यातून रिया आणि तिच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात सुशांतच्या बँकेतून 15 कोटी रुपये ट्रान्सफर झाले.
 • 28 जुलै रोजी पाटणा पोलिसांच्या चार अधिका-यांचे पथक (SIT) मुंबईत पोहोचले. आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याच रात्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब घरातून बेपत्त झाले. हे प्रकरण पाटणा येथून मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
 • 29 जुलै रोजी पाटणा पोलिसांनी रिया आणि तिच्या कुटूंबाचा शोध घेतला. पण ते सापडले नाहीत. दरम्यान, सुशांतची बहीण मीतू, कुक नीरज, मित्र सिद्धार्थ पिठानी, चित्रपट निर्माते रुमी जाफरी यांच्यासह 10 हून अधिक जणांची बिहार पोलिसांकडून चौकशी झाली.
 • 31 जुलै रोजी ईडीने रियाविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
 • रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया 31 जुलै रोजी आली. तिने 20 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये ती हात जोडून म्हणाली की, “मला देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल असा विश्वास आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये माझ्याबद्दल भयानक गोष्टी बोलल्या जात असल्या तरी, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माझ्या वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी त्यावर कोणतंही भाष्य करणार नाही. सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईल”. रिया चक्रवर्तीने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांना नियुक्त केले आहे. त्यांच्याकडूनच हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला.
 • 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. ते म्हणाले की, हे प्रकरण बिहार विरुद्ध महाराष्ट्र होऊ देणार नाही. तसेच कोणाकडे या प्रकरणाशी संबंधित पुरावे असतील तर ते आम्हाला द्या. जेणेकरून दोषींना शिक्षा होऊ शकेल.
 • 2 ऑगस्ट रोजी पाटण्याचे एसपी विनय तिवारी हे चौकशीसाठी विमानाने मुंबईत दाखल झाले. परंतु रात्री 11 वाजता, बीएमसीच्या पथकाने कोरोना नियमांचे कारण सांगून सक्तीने त्यांना क्वारंटाइन केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यावर नाराजी व्यक्त केली.
 • 3 ऑगस्ट रोजी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सुशांतच्या खात्यातून रियाच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केल्याचा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही. सुशांत मृत्यूपूर्वी पेनलेस डेथ, बायपोलर डिसऑर्डर या गोष्टी गुगलवर सर्च करायचा.
 • 3 ऑगस्ट रोजी रियाचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, रिया गायब झाली नसून ती पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण पाटणा येथून मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
बातम्या आणखी आहेत...