आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री संजना सांघी हिचा जबाब नोंदवला आहे. मंगळवारी तब्बल 9 तास पोलिसांनी तिची 9 तास चौकशी केली. संजनाने सुशांतसोबत त्याचा अखेरचा चित्रपट ठरलेल्या 'दिल बेचारा'मध्ये काम केले होते.
चौकशीत मुंबई पोलिसांनी 'दिल बेचारा' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुशांतवर ‘मीटू’ प्रकरणात झालेले आरोप, चित्रीकरण सुरु असताना त्याला डिप्रेशन आले होते का, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न संजना सांघी हिला विचारले.
आपल्या जबाबात संजनाने महत्त्वाच्या मुद्दे सांगितले..
संजनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले, '2018 मध्ये ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या ऑडिशननंतर मला कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी निवडले होते. छाबरा हे या चित्रपटाचे दिग्दर्शकही होते. मला नंतर समजले, की या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या सेटवरच मी सुशांतला पहिल्यांदा भेटले', असे संजनाने सांगितले.
संजनाच्या दाव्यानुसार तिने सुशांतसिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा आरोप केला नव्हता किंवा अशी कोणतीही घटना घडली नव्हती. याविषयी ती म्हणाली, '2018 मध्ये जेव्हा मीटू मोहीम सुरु होती, तेव्हा कुणीतरी अशी अफवा उठवली की, शूटिंग दरम्यान सुशांतने चुकीच्या पद्धतीने मला हात लावला, मात्र तसे काही झालेच नव्हते. पण मला याबद्दल त्यावेळी काहीच माहिती नव्हती. चित्रपटाच्या एका भागाचे शूटिंग झाले होते. माझे शूट नसल्याने मी मी आईबरोबर अमेरिकेला गेले होते', अशी माहिती संजनाने पोलिसांना दिली.
संजनाने सांगितल्यानुसार, 'मी परदेशी असताना माझ्या अपरोक्ष माझ्या नावाने सुशांत सिंह याच्याविरोधात अनेक आरोप होत होते. सोशल मीडिया, वृत्तपत्र आणि टीव्हीवरुन त्याच्यावर आरोप होत होते. ब्लाइंड स्पॉट्सच्या माध्यमातून सुशांतवर आरोप होत होते. पण मी कोणताही आरोप केला नव्हता. मी अमेरिकेहून परत आल्यावर मला सर्व गोष्टी समजल्या. ते सर्व चुकीचे होते. त्यामुळे मी त्याबाबत सोशल मीडियावर खुलासाही केला होता. सुशांतवर चुकीचे आणि खोटे आरोप होत असल्याचं म्हटले होते', असे संजनाने जबाबात सांगितले.
संजनाने पोलिसांना सांगितल्यानुसार, मी सुशांत आणि मुकेश दोघांनाही भेटले. या घटनेमुळे सुशांत खूप नैराश्यात आला होता. मीटू मोहिमेच्या माध्यमातून आपली बदनामी सुरु आहे. आपल्याला ट्रोल केले जात आहे असे सुशांतने मला सांगितले होते, असे संजना म्हणाली.
संजनाने पोलिसाना सांगितल्यानुसार, सुशांतने तिच्यासोबत झालेल्या त्याच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकल्याने तिची माफी मागितली होती. संजना त्यावेळी परदेशी होती, त्यामुळे तिच्याशी सुशांतचा संपर्क होऊ शकत नव्हता आणि तो या सगळ्या प्रकारामुळे प्रचंड मानसिक तणावात आला होता. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगण्यासाठी सुशांतने दोघांत झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकला होता. संजनाने सांगितल्यानुसार, याबाबत तिची काहीच हरकत नव्हती. कारण ते सर्व आरोप चुकीचे होते. अफवा होत्या आणि अशा परिस्थितीत सुशांतजवळ दुसरा मार्ग नव्हता, असे तिने सांगितले.
संजना सांघीने सांगितल्यानुसार, सुशांत सेटवर अतिशय नॉर्मल आणि प्रेझेन्स ऑफ माइंड असलेल्या व्यक्तींपैकी एक होता. खासगी आयुष्यात काय सुरु आहे, याविषयी तो कधीही काहीही बोलत नव्हता. पण कधी कधी तो त्याच्या पाटण्यातील त्याच्या कुटुंबाविषयी बोलायचे आणि विनोदी किस्से सांगायचा. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशन असल्याची माहिती नसल्याचे संजनाने पोलिसांना सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.