आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Suicide Case: Former Union Minister Subramanian Swamy Asked Advocate Ishkaran Singh Bhandari To Investigate Case In The Row Of CBI Inquiry

सीबीआयकडे जाणार सुशांत आत्महत्या प्रकरण?:सुब्रमण्यम स्वामी यांनी अ‍ॅडव्होकेट ईशकरण यांना तथ्यांची चौकशी करण्यास सांगितले.  म्हणाले - घटनेचे कलम शोधले जात आहेत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांची विचारपूस सुरूच आहे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी त्याचे चाहते सातत्याने करत आहेत. भाजप खासदार रूपा गांगुली आणि अभिनेता शेखर सुमन यांनीही यावर आवाज उठविला आहे. आता भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले आहे. 

सुब्रमण्यम स्वामींनी वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक ईशकरण सिंह भंडारी यांना या प्रकरणातील तथ्यांची चौकशी करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करणे योग्य आहे की नाही हे त्यांना समजू शकेल.

  • सध्या राज्यघटनेचे कलम बघितले जात आहेत 

स्वामी यांच्यानुसार, या प्रकरणात घटनेतील कोणते कलम लागू होतात, हे ईशकरण सध्या तपासत आहेत. त्यांनी लिहिले की -  ईशकरण सध्या या प्रकरणात कलम 21 तसेच आयपीसी कलम 306 किंवा 308 लागू होते की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. अन्यथा पोलिसांचे व्हर्जन स्वीकारले जाईल, त्यानुसार ही आत्महत्या होती, किंवा अभिनेत्यास असे करण्यास भाग पाडले गेले होते?, याचा ते शोध घेत असल्याचे स्वामी यांनी सांगितले. 

जेव्हा एका नेटकरीने स्वामींना विचारले की, या प्रकरणात कलम 302चा अँगला का बघितला जात नाहीये? तर स्वामींनी उत्तरात लिहिले की, ट्रायल दरम्यान ते 302 मध्ये बदलले जाईल. स्वामींनी दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले आहे - याची सुरुवात आत्महत्या म्हणून केली जाईल आणि सीबीआय चौकशीत पुरावा मिळाल्यानंतर दोषारोपपत्रात हा खुनाचा आरोप ठरेल.

  • रुपा गांगुली यांनी ईशकरण यांचे आभार मानले

सुशांत प्रकरणात हस्तक्षेप केल्याबद्दल रूपा गांगुली यांनी ईशकरण यांचे आभार मानले आहेत. शुक्रवारी त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले- धन्यवाद सर. आपल्यासारख्या अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारण्यांचा हस्तक्षेप सत्याच्या शोधासाठी आशा आणि धैर्य आणेल.

ईशकरण सिंह भंडारी यांनी रुपा यांच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले आहे- धन्यवाद रुपा. सुशांत सिंह राजपूत यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सातत्याने आवाज उठवत आहात. सत्य शोधण्यासाठी आणि पुढील पाऊल उचलण्यासाठी मी सर्व कागदपत्रे आणि पुरावे शोधत आहे.

यासोबतच ईशकरण यांनी सोशल मीडिया यूजर्सना त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित माहिती इमेलद्वारे पाठविण्यास सांगितले आहे. तथापि, त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, केवळ योग्य माहिती पाठविली पाहिजे जेणेकरून प्रकरण लवकरात लवकर समजू शकेल.

  • आतापर्यंत 34 जणांचे जबाब नोंदवले गेले

मुंबई पोलिस पहिल्या दिवसापासूनच याप्रकरणी सातत्याने तपास करत आहेत. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यापासून आतापर्यंत 34 जणांची या प्रकरणात चौकशी झाली आहे. यामध्ये त्याचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. सुशांतने आत्महत्या केल्याचे त्याच्या पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र त्याच्या आत्महत्येमागील खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांची विचारपूस सुरूच आहे

यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवली आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल. शानू शर्मा यांना पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावले जाऊ शकते.

याशिवाय चित्रपट निर्माते शेखर कपू यांनी ईमेलद्वारे आपला जबाब पोलिसांना पाठवला आहे. तर संजय लीला भन्साळी यांचाही जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला आहे.  अभिनेत्री कंगना रनोटचीही पोलिस चौकशी करू शकतात. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीही काहीसे असेच संकेत दिले होते.  

0