आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Suicide Case Investigation Today Update | Mumbai Police On Actress Rhea Chakraborty, Casting Director Mukesh Chhabra; 5 Diaries Recovered From Sushant's House

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतच्या निकटवर्तीयांची चौकशी:रिया चक्रवर्ती पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली, आत्महत्येच्या तीन दिवस आधी सुशांतने दिला होता सर्व कर्मचाऱ्यांचा पगार, म्हणाला होता...

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितल्यानुसार, याप्रकरणी दहा जणांचा जबाब नोंदवला गेला आहे.
  • सुत्रांच्या माहितीनुसार, इंडस्ट्रीतील गटबाजीविषयी सुशांतच्या निकटवर्तीयांनी जबाबात काहीही सांगितलेले नाही

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिस त्याच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदवत आहे. गुरुवारी त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला पोलिसांनी चौकशीसाठी वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये बोलावले होते. रियासोबत सुशांत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. यापूर्वी बुधवारी पोलिसांनी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाची पोलिसांनी चौकशी केली होती. जवळपास 7 तास ही चौकशी सुरु होती.

रिया सुशांतच्या अतिशय जवळ होती. त्यामुळे तिच्याकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
रिया सुशांतच्या अतिशय जवळ होती. त्यामुळे तिच्याकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

मुकेश सुशांतचा जवळचा मित्र होते. त्यांनी सोबत चित्रपटदेखील केले होते. मुकेश यांनी सुशांतच्या आवडीनिवडी आणि त्याच्या स्वप्नांविषयी पोलिसांना माहिती दिली. मुकेश यांनी पोलिसांना सांगितल्यानुसार, सुशांत त्यांच्याकडे कधीही खासगी गोष्टी शेअर करत नव्हता. सुशांत डिप्रेशनमध्ये होता, हेदेखील आपल्याला ठाऊक नसल्याचे मुकेश यांनी पोलिसांना सांगितले. 

आत्महत्येच्या तीन दिवस आधी सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दिला होता

सुशांतच्या घरी काम करणा-या एका कर्मचा-याने पोलिसांना सांगितले,  सुशांतने आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले होते. पगार देताना त्याने कर्मचाऱ्यांना असेही म्हटले होते की, त्याला यापुढे पैसे देणे  शक्य होणार नाही. सोबतच त्याने उसनवारीही परत केली होती. 

सुशांतच्या घरातून सापडल्या 5 डायरी

डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगिकल्यानुसार, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दहा जणांचा जबाब नोंदवला गेला आहे.  सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला बुधवारी समन पाठवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, इंडस्ट्रीतील गटबाजीविषयी सुशांतच्या निकटवर्तीयांपैकी कुणीही काहीही बोलले नाहीत. पोलिसांना सुशांतच्या घरातून पाच डायरी मिळाल्या आहेत. सुशांतला वाचनाची विशेष आवड होती.विशेषतः फिजिक्स विषयाची. पुस्तकांमध्ये वाचलेले कोट तो डायरीत लिहित असे.

नागालँड सरकारला दीड कोटींची केली होती मदत

पोलिसांना  सुशांतच्या घरातून काही कागदपत्रं मिळाली आहेत. यात सुशांतने नागालँड सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीत दीड कोटींची मदत केल्याचा उल्लेख आहे. नागालँड सरकारच्या वतीने   त्याला पाठवण्यात आलेल्या पत्रातून सुशांत समाजसेवेतही सक्रिय होता, हे दिसून येते.  

बातम्या आणखी आहेत...