आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरणात मोठा दावा:कंगना रनोटच्या टीमचा हल्ला, म्हणाले - पोलिस करण जोहरला चौकशीसाठी बोलावणार नाहीत, कारण तो आदित्य ठाकरेंचा मित्र आहे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कंगना रनोटच्या टीमने ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एक ट्विटला उत्तर देताना केला हा दावा
 • या प्रकरणाता आतापर्यंत 37 लोकांची झाली चौकशी झाली आहे. यात आदित्य चोप्रा, राजीव मसंद सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात करण जोहरची चौकशी होत नसल्याने अभिनेत्री कंगना रनोेटने थेट महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. करण जोहर हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा मित्र आहे, त्यामुळे त्याला कधीही पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात येणार नाही असा दावा कंगनाने केला आहे. एक टि्वटला उत्तर देताना कंगनाच्या टीमने हा दावा केला आहे.

 • ट्विटर युजरचा हा होता प्रश्न

सुमित ठाकूर नावाच्या एका ट्विटर युजरने करण जोहरचा फोटो शेअर करीत लिहले होते की, 35 दिवस झाले, मात्र अजूनही यातील संशयित करण जोहरला सुशांतच्या केसमध्ये चौकशीसाठी बोलावले नाही, मी वकील रसपाल सिंह रेणू यांच्या माध्यमातून मुंबई पोलिसांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत आहे जेणेकरुन जनहिताची स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी होऊ शकेल."

 • टीम कंगना रनोटची प्रतिक्रिया

ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगनाच्या टीमने लिहिले की, "ते कधीही त्याला बोलावणार नाहीत. कारण तो आदित्य उद्धव ठाकरे यांचा चांगला मित्र आहे. हे त्यांचे सरकार आहे आणि त्यांनी कंगनाच्या मुलाखतीपूर्वी हे प्रकरण बंद केले. ते आपल्या मित्राचा बचाव करत असल्याचा हा पुरावा आहे."

 • कंगनाने अनेक मुलाखतींमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत

सुशांतच्या निधनानंतर कंगनाने अनेक मुलाखतींमध्ये पोलिस करण जोहरची चौकशी का करत नाहीये? हा प्रश्न उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कंगनाने करण व्यतिरिक्त आदित्य चोप्रा, राजीव मसंद आणि महेश भट्ट यांची नावेही गटबाजी करणा-यात जोडली होती आणि मुंबई पोलिसांनी त्यांची चौकशी करावी असे सांगितले होते. इतकेच नाही तर कंगनाने असेही म्हटले आहे की, जर ती आपले दावे सिद्ध करण्यास अक्षम राहिली तर ती आपला पद्मश्री पुरस्कार सरकारकडे परत करण्यास तयार आहे.

आतापर्यंत 37 लोकांची चौकशी करण्यात आली आहे

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्याचे पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच, पोलिसांच्या तपासणीत तो डिप्रेशनमध्ये असल्याचेही समोर आले आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये का होता? आणि त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी 37 जणांची चौकशी केली. यात ब-याच मोठ्या नावांचा समावेश आहे -

 • यामध्ये सुशांतवर उपचार करणा-या चारही डॉक्टरांव्यतिरिक्त, चित्रपट समीक्षक राजीव मसंद, यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा, सुशांतचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवला आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल.
 • 23 जुलै रोजी पोलिसांनी सुशांतचे मित्र आणि फिल्ममेकर रुमी जाफरी यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावले होते. जाफरी यांनी पोलिसांना सांगितल्यानुसार, सुशांत सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे त्यांना ठाऊक होते. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीकडुन त्यांना याविषयी समजले होते.
 • 21 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी चित्रपट समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव मसंद यांची आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. त्यांच्यावर कुणाच्या तरी सांगण्यावरुन सुशांतविरोधात निगेटिव्ह ब्लाइंड आर्टिकल लिहिल्याचा आणि त्याच्या चित्रपटांना निगेटिव्ह रिव्ह्यू देत असल्याचा आरोप आहे.
 • यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माता आदित्य चोप्रा यांची मुंबई पोलिसांनी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये चौकशी केली. वास्तविक सुशांतने आदित्य चोप्रासह 'शुद्ध देसी रोमान्स', 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' आणि 'पानी' या तीन सिनेमांसाठी करार केला होता. पण 'पानी' हा चित्रपट तयार होऊ शकला नाही. याबद्दल आदित्य यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांनी सांगितले की, दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबतच्या क्रिएटिव्ह डिफरन्समुळे हा चित्रपट बनू शकला नाही.
 • याशिवाय फिल्ममेकर संजय लीला भन्साळींचीही चौकशी झाली आहे. 'पानी' या चित्रपटासाठी आपले चार चित्रपट सुशांतने सोडले होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, "मी सुशांतला ऑफर केलेले चार चित्रपट म्हणजे 'गोलियों की रासलीला रामलीला', 'बाजीराव-मस्तानी', 'रीड' (जो बनला नाही) आणि 'पद्मावत'. सुशांत 'रामलीला'च्या वेळी YRFसोबत करारात होता. आणि 'पानी'साठी कार्यशाळा घेत होता. त्याचप्रमाणे मी सुशांतला 'बाजीराव-मस्तानी', 'रीड' आणि 'पद्मावत' (शाहिद कपूरची भूमिका) साठी भेटलो होतो. पण त्याने आपल्या सर्व तारखा 'पानी' या चित्रपटासाठी दिल्या होत्या.
 • चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी ईमेलद्वारे आपला जबाब पोलिसांना पाठवला आहे. शेखर कपूर यांनी सांगितले की, पानी हा चित्रपट बंद झाल्याने सुशांतला मोठा धक्का बसला होता. तो खचून डिप्रेशनमध्ये गेला होता. कारण या चित्रपटासाठी त्याने आपली बरीच वर्षे दिली होती. याकाळात त्याने अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. शेखर कपूर यांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्येही बोलावले जाऊ शकते.
 • अभिनेत्री कंगना रनोटचीही पोलिस चौकशी करणार आहे. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीहीकाहीसे असेच संकेत दिले होते. कंगनाने सांगितल्यानुसार, तिला पोलिसांकडून चौकशीसाठी समन मिळाले आहे. पण सध्या ती मनालीत असल्याने चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही.

दरम्यान, खासदार रुपा गांगुली, अभिनेता शेखर सुमन, टीव्ही अभिनेता तरुण खन्नासह अनेक जणांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक ईशकरण सिंह भंडारी यांना या प्रकरणातील तथ्यांची चौकशी करत असून सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करणे योग्य आहे की नाही हे तपासत आहेत.