आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Suicide Case: Karan Johar, Alia Bhatt, Kareena Kapoor And Other Limits Comments On Their Instagram Posts Amid Nepotism Controversy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराणेशाहीचा वाद उफाळला:करण जोहर, आलिया, सोनम, करीनासह 6 मोठ्या सेलिब्रिटींनी लॉक केले इंस्टाग्रामचे कमेंट सेक्शन 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करण जोहर आणि त्याच्या कॅम्पशी जुळलेल्या लोकांनी लॉक केला कमेंट सेक्शन
  • सुशांतच्या आत्महत्येनंतर कमेंट सेक्शन लॉक करणारी सोनम कपूर पहिली सेलेब्रेटी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि कंपूशाहीवरुन सुरु झालेला वाद शमण्याची चिन्हं दिसतं नाहीयेत.  सोशल मीडियावर प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसेस, त्यांचे मालक आणि स्टार किड्सवर सतत टीका होत आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करुन सुशांतने अशा लोकांमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, याची सतत जाणीव करुन दिली जात आहे. 

हे प्रकरण एवढे वाढले की, अर्धा डझनहून अधिक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील कमेंट सेक्शनला सामान्य लोकांसाठी लॉक केले आहे. यामध्ये करण जोहर, आलिया भट्ट, करीना कपूर, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, अनन्या पांडे आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान यांचा समावेश आहे. आता केवळ त्यांचे जवळचे मित्रच या सेलिब्रिटींच्या पोस्टवर कमेंट देऊ शकतील.

कमेंट सेक्शन लॉक करायला सोनम कपूरने केली सुरुवात 

पहिल्यांदा अभिनेत्री सोनम कपूरने तिचा कमेंट सेक्शन लॉक केला. खरं तर सुशांतच्या निधनानंतर सोनमने त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी एक पोस्ट लिहिली होती. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल केले आणि 'कॉफी विथ करण' या शोची आठवण करून दिली, ज्यात तिने सुशांतला ओळख नसल्याचे सांगून त्याची खिल्ली उडवली होती.

इतकेच नाही तर सोशल मीडिया यूजर्सनी सोनमला तिच्या त्या वक्तव्यासाठीदेखील लक्ष्य केले होते, ज्यात तिने म्हटले होते की, एखाद्याच्या मृत्यूसाठी त्याची गर्लफ्रेंड, एक्स-गर्लफ्रेंड,  कुटुंब, सहका-यांना दोषी ठरविणे हे अज्ञान आहे. ट्रोल्समुळे त्रस्त झालेल्या सोनमने तिच्या कमेंट्स सेक्शनला लॉक करून इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही माहिती दिली.

सोनमने लिहिले- मित्रांनो मी सहसा द्वेष आणि निगेटिव्हिटीपासून घाबरुन पळत नाही. कारण ज्या लोकांच्या मनात खूप द्वेष आहे अशा लोकांना पाहून मला त्यांची दया येते. माझ्यापेक्षा हे त्यांच्यासाठी अधिक हानिकारक आहे. पण हे माझे कुटुंब आणि मित्रांना त्रास देत आहे. मला माहित आहे की, ते पेड आणि एका अजेंड्याखाली काम करीत आहेत. परंतु, सध्या सीमेवर ज्यांनी आपला जीव गमावला आणि लॉकडाऊनने बाधीत झालेल्यांसांठी बोलण्याची वेळ आहे. म्हणून मी माझे कमेंट्स सेक्शनला बंद करत आहे.

  • कंगनाच्या वक्तव्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झाला

14 जून रोजी नैराश्याने त्रस्त असलेल्या सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यासाठी कंगना रनोटने थेट करण जोहरला दोषी ठरवत त्याच्यावर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. त्यानंतर शेखर कपूर, अनुभव कश्यप, अभय देओल, कोयना मित्रा, रवीना टंडन यासारखे सेलिब्रिटी पुढे आले आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या गटबाजीवर भाष्य केले. त्यांना सोशल मीडिया यूजर्ससाठी यासाठी मोठा पाठिंबादेखील मिळाला.

करण जोहर, आदित्य चोप्रा, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला यांना बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीसाठी दोषी ठरवले गेले आणि स्टारकिड्सनाही लक्ष्य केले गेले.

  • मग सुरु झाला ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा सिलसिला

  हे प्रकरण वाढत चालल्याचे पाहून करण जोहरने ट्विटरवर 8 लोक (अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान, नरेंद्र मोदी आणि 4 ऑफिस मेंबर्स) वगळता इतर सर्वांना अनफॉलो केले. त्यानंतर सुरु झाला ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा सिलसिला. सलमान खानच्या कॅम्पशी संबंधित असलेल्या सोनाक्षी सिन्हाने आपले ट्विटर अकाऊंट डिलीट केले.  

सोनाक्षी सिन्हानंतर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा, साकीब सलीम आणि झहीर इक्बाल यांनीदेखील त्यांचे ट्विटर अकाऊंट डिलीट केले. त्याचबरोबर या कॅम्पशी जुळलेला निर्माता मुदस्सर अझीझ यांनीही इंस्टाग्रामला गुडबाय केले. सर्वांनी ट्विटरचे द्वेष पसरवण्याचे स्थान म्हणून वर्णन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...