आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मित्राने केलेला दावा खोटा?:नीतू कपूर यांच्या पार्टीत दिसला करण जोहर, नेटकरी म्हणाले - 'हा तर खूप खचला आहे असे ऐकले होते?'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीतू कपूर यांचा 8 जुलै रोजी वाढदिवस होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर करण जोहरवर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला जात असून त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. बुधवारी करणच्या एका जवळच्या मित्राने माध्यमांना सांगितले की, ट्रोलिंगमुळे तो चांगलाच खचला असून असून बोलण्याच्या स्थितीतही नाही. पण संध्याकाळीच मित्राचा हा दावा खोटा ठरला. कारण तो नुकताच एका पार्टीमध्ये दिसला. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याने हजेरी लावली होती. त्यावरुन तो पुन्हा एकदा नेटक-यांच्या निशाण्यावर आला आहे.

  • नीतू यांनी पार्टीचे फोटो केले शेअर

ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी नुकताच आपला 62 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांकडून एका छोटेखानी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत नीतू यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर-साहनी, रीमा जैन यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यही उपस्थित होते. त्यांच्यासह करण जोहरदेखील पार्टीच्या फोटोमध्ये दिसून येतोय. 

नीतू यांनी फोटो शेअर करुन त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "सर्वात श्रीमंत हे चांगली नाते असलेले असतात. आपल्या सर्वांना नेहमीच आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेम, पाठबळ, शक्तीची गरज असते. आज मी स्वतःला सर्वात श्रीमंत असल्याचे अनुभवत आहे." नीतू यांनी बुधवारी वयाच्या 63  व्या वर्षात पदार्पण केले. 

  • नेटक-यांनी करणवर साधला निशाणा  

नीतू कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत करणचा फोटो पाहिल्यानंतर एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, "मी कुठेतरी वाचले होते की करण जोहर खूप खचला आहे, पण तो तर अगदी ठिकठाक दिसतोय."

आणखी एका यूजरने लिहिले, ड्रामा क्वीन दुःखी दिसत नाहीये. तर एका यूजरने लिहिले की, "करण जोहर मांजरीच्या कुत्र्यासारखा रडत असल्याचे आम्ही ऐकले होते. हा किती ढोंगीपणा आहे", असे म्हणत यूजर्स करण जोहरला ट्रोल करत आहेत.

काही सोशल मीडिया यूजर्सच्या कमेंट्सचा स्क्रीन शॉट
  • मित्राने केला होता हा दावा

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरच्या जवळच्या एका मित्राने दावा केला होता की, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे तो खूप खचला आहे. तो बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. जेव्हाही त्याला कॉल करतो, तेव्हा तो रडत असतो, असे त्याच्या मित्राने सांगितले होते. 

0