आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बायकॉट मोहिम:करण, सलमान-यशराजवर बहिष्काराची मोहिम, सुशांतला न्याय मिळून देण्यासाठी 30 तासांत 8.50 लोकांनी ऑनलाइन याचिकेवर केली सही

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या याचिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या अकाली निधनामुळे सगळ्यांनाचा प्रचंड मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  गेल्या सहा महिन्यांत त्याच्या हातून सात चित्रपट गेल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्येत होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातोय. 

बॉलिवूडमधील मोठ्या मीडिया हाऊसेसनी सुशांतला बॅन केल्याची चर्चा आहे. करण जोहर, सलमान खान, यशराज फिल्म्स या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसचे नाव यात समोर येत आहे. आता बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात जयश्री शर्मा श्रीकांत नावाच्या एका फेसबूक यूजरने ऑनलाइन याचिका दाखल केली असून त्यासाठी सह्यांची मोहिम राबवली जात आहे.

30 तासांत 8.50 लाखांहून अधिक लोकांनी केली सही  

या याचिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.  जयश्री शर्मा श्रीकांत यांनी 16 जून रोजी सायंकाळी 6:47 वाजता  Change.org वर ही मोहिम सुरु केली.  "कृपया सही करा आणि शेअर कला. आपण फिल्म इंडस्ट्रीत बदल घडवून आणू शकतो आणि असं काहीतरी पुन्हा पुन्हा होण्यापासून रोखू शकतो." अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. जयश्री यांनी 10 लाख सह्यांचे लक्ष्य समोर ठेऊन ही मोहिम सुरु केली असून 30 तासांत 8.50 लाखांहून अधिक लोकांनी त्यावर सही केली आहे.

जयश्री श्रीकांत कोण आहे?

जयश्री यांच्या फेसबुक प्रोफाइलनुसार त्या बॉलिवूड नृत्यदिग्दर्शक, कलाकार, दिग्दर्शक आणि रेडिओ जॉकी आहेत. त्या मुळच्या केनियाच्या नैरोबीच्या असून सध्या प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे वास्तव्याला आहेत. उत्तर अमेरिकेतील दक्षिण एशियाई रेडिओ स्टेशन रुकुस एव्हेन्यू येथे त्या रेडिओ जॉकी आहेत.

बातम्या आणखी आहेत...