आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:पोलिसांनी सुशांतच्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले, सुशांतच्या अभिनेत्री असलेल्या मैत्रिणीची चौकशी होणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 14 जूनपासून 34 जणांची चौकशी केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी तो वास्तव्याला असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या सहाय्याने आत्महत्येचे गूढ सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, पोलिसांना सुशांतच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा सापडला नाही.

  • सुशांतच्या अभिनेत्री असलेल्या मैत्रिणीची होऊ शकते चौकशी 

या प्रकरणातील आणखी एक प्रमुख अपडेट म्हणजे पोलिस सुशांतच्या अभिनेत्री असलेल्या मैत्रिणीला चौकशीसाठी बोलावू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी काही पत्रकारांना सुशांतबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबद्दल विचारपूस केली असता त्याच्याशी संबंधित बरीच माहिती पत्रकारांना या अभिनेत्रीने दिल्याचे निष्पन्न झाले.

आतापर्यंत या अभिनेत्रीला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले नाही. पण लवकरच तिचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. अभिनेत्री स्वत:ला सुशांतची जवळची मैत्रीण म्हटले आहे. त्याच्या अंत्यसंस्कारातही ती उपस्थित होती. पत्रकारांना दिलेल्या माहितीमागे अभिनेत्रीचा काही विशिष्ट हेतू होता की नाही हे पोलिसांना जाणून घ्यायचे आहे.

  • आतापर्यंत 34 जणांचे जबाब नोंदवले गेले

14 जून रोजी सुशांतने त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या केल्याचे त्याच्या पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र त्याच्या आत्महत्येमागील खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांची विचारपूस सुरूच आहे

मुंबई पोलिस पहिल्या दिवसापासूनच याप्रकरणी सातत्याने तपास करत आहेत. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यापासून आतापर्यंत 34 जणांची या प्रकरणात चौकशी झाली आहे. यामध्ये त्याचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.

यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवली आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल. शानू शर्मा यांना पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावले जाऊ शकते.

याशिवाय चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि अभिनेत्री कंगना रनोट यांचीही पोलिस चौकशी करू शकतात. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीही काहीसे असेच संकेत दिले होते.  

0