आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:पोलिसांकडून यशराज फिल्म्सच्या दोन माजी अधिका-यांची पाच तास चौकशी, कास्टिंग डायरेक्टरलाही चौकशीसाठी बोलावले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतबरोबरच्या कराराच्या अटींबाबत दोन अधिका-यांना प्रश्न विचारले गेले.
  • यशराजच्या कास्टिंग डायरेक्टरलाही काही कागदपत्रे सोबत आणण्यास सांगितले गेले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सच्या दोन माजी अधिका-यांचा जबाब नोंदवला आहे. रिपोर्ट्सनुसार, 2012 मध्ये जेव्हा सुशांतने यशराजसोबत करार केला होता, तेव्हा हे दोन्ही कार्यकारी अधिकारी प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित होते.

  • कराराच्या अटींविषयी विचारपुस केली गेली 

सुशांत सिंह राजपूतने 2012 मध्ये यशराज फिल्म्स बरोबर करार केला होता. या करारावर आशिष सिंह आणि आशिष पाटील या दोघांच्या स्वाक्षऱ्या होत्या. आशिष सिंह हे यशराज फिल्म्सचे माजी उपाध्यक्ष आहेत तर आशिष पाटीलही तिथे वरिष्ठ पदावर होते. पोलीस दलातील सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

  • काय म्हणाले आशिष सिंह?

आशिष सिंह यांची जवळपास पाच तास चौकशी सुरु होती. त्यांनी सुशांतच्या यशराज फिल्म्सबरोबर असलेल्या कराराची सर्व माहिती दिली. सुशांतची वायआरएफमधून एक्झिट आणि हा करार नेमक्या कशा स्वरुपाचा होता, याबद्दल आशिष सिंह इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना म्हणाले की, “मी कराराबद्दल कुठल्याही गोष्टी उघड करणार नाही. खूप खेळीमेळीच्या वातावरणात सुशांत करारामधून बाहेर पडला. त्यानंतरही आम्ही संपर्कात होतो. आम्ही दोन चित्रपट केले. काही चित्रपट पूर्णत्वाला जाऊ शकले नाहीत. सुशांत पाच वर्षांपूर्वी वायआरएफमधून बाहेर पडला. त्यानंतरही आम्ही संपर्कात होतो. कुठलाही वादाचा विषय नव्हता', असे त्यांनी सांगितले. 

  • प्रॉडक्शन हाऊसच्या कास्टिंग डायरेक्टरलाही बोलावले

सूत्रांच्या माहितीनुसार, यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टरलाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले आहे. शनिवारी दुपारी त्याची चौकशी केली जाईल. याच कास्टिंग डायरेक्टरने यशराजसाठी सुशांतला साइन केले होते. त्याला या संदर्भातील कागदपत्रेही पोलिसांनी मागितली आहेत.

  • मागील आठवड्यात कराराची प्रत सादर केली गेली

गेल्या आठवड्यात यशराजने सुशांतबरोबर त्यांच्या जुन्या कराराची प्रत पोलिसांकडे सादर केली. या कागदपत्रांमध्ये सुशांतबरोबर यशराजच्या तीन चित्रपटांचा उल्लेख आहे. त्यापैकी दोन चित्रपट 'शुद्ध देसी रोमान्स' आणि 'ब्योमकेश बक्षी' हे चित्रपट तयार झाले. तर  'पानी' हा तिसरा चित्रपट होता, जो नंतर डबाबंद झाला होता.

  •  यशराज फिल्म्सकडून कलाकारांसोबत सहसा 3 चित्रपटांचा करार केला जातो

यशराज फिल्म्स कलाकारांसोबत तीन चित्रपटांची डील करतात. चित्रपटांच्या यशावर करार पुढे केला जातो. सुशांतसोबतचा त्यांचा तिसरा चित्रपट 'पानी' न करण्यामागील कारण त्याचे बजेट असल्याचे सांगितले जाते. या चित्रपटासाठी दिग्दर्शक शेखर कपूर यांनी दीडशे कोटींपेक्षा जास्त बजेट दिल्याचे व्यापारांशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे. यशराजला हे बजेट अधिक वाटले आणि त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. यामुळे शेखर आणि सुशांत दोघेही दुखावले गेले होते.

  • इतर प्रॉडक्शन हाऊसचीही चौकशी केली जात आहे

यशराजशिवाय मुंबई पोलिस इतर प्रॉडक्शन हाऊसचीही चौकशी करत आहेत, जिथे सुशांतने चित्रपट साइन केले होते. च वेळी, पोलिसांचे एक पथक अभिनेत्याच्या आर्थिक बाबींचा शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...