आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:संजय लीला भन्साळींची मुंबई पोलिसांकडून तीन तास चौकशी, दोन चित्रपटांत सुशांतला रिप्लेस केल्याचा आहे आरोप 

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • वृत्तानुसार, भन्साळींनी दोन चित्रपटांसाठी सुशांतकडे संपर्क साधला होता, पण त्यानंतर रणवीरला त्याच्या जागी कास्ट केले गेले.
 • 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी 30 हून अधिक लोकांची चौकशी केली आहे.
Advertisement
Advertisement

सोमवारी मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चित्रपट निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची सुमारे 3 तास चौकशी केली. गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भन्साळी आणि शेखर कपूर यांना समन्स पाठवले होते. यात प्रथम भन्साळी यांना आज चौकशीसाठी बोलविण्यात आले. सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ जणांपैकी भन्साळी एक आहेत.

अपडेट

 • 12:40 वाजता: गडद निळ्या रंगाचे शर्ट-जीन्स परिधान करून, एन 95 मास्क घातलेले भन्साळी वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि मीडियाला टाळून पहिल्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर गेले. येथेच विशेष पोलिस अधिका्यांनी त्यांचा जबाब नोंदवला.
 • 12:20 वाजता : भन्साळी आपल्या जुहूस्थित ऑफिसमधून वांद्रे पोलिस स्टेशनला रवाना झाले. सुशांतचे प्रकरण वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाकडून हाताळले जात आहे.
 • 11 वाजता: भन्साळी जुहू येथील आपल्या ऑफिसमध्ये दाखल झाले आणि तेथे सुमारे एक तास आपल्या लीगल टीमसोबत चर्चा केली.
 • 3:50 वाजता : भन्साळी वांद्रे पोलिस ठाण्यातून बाहेर आले. येथे जवळजवळ तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी पोलिसांना काय सांगितले याचा खुलासा झाला नाही.
 • भन्साळी यांच्या चौकशीमागचे कारण

रिपोर्ट्सनुसार, भन्साळींनी सुशांतला 'गोलियां की रासलीला: रामलीला' या चित्रपटाची ऑफर दिली होती. पण नंतर त्याच्या जागा रणवीर सिंगची वर्णी लागली. 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या बाबतीतही असेच घडल्याचे बोलले जात आहे. सुशांतला प्रथम 'बाजीराव मस्तानी'साठी संपर्क साधण्यात आला होता, पण नंतर रणवीर सिंगला मुख्य भूमिकेत घेण्यात आले होते. या दोन्ही चित्रपटाशी संबंधित पैलूंवर मुंबई पोलिस भन्साळी यांची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 • बिहारमध्ये या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नाडियाडवाला, सलमान खान, भूषण कुमार, एकता कपूर आणि दिनेश विजान, संजय लीला भन्साळी यांच्याविरोधात वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे लोक ठरवून सुशांतचे चित्रपट प्रदर्शित होऊ देत नव्हते, असा ओझा यांचा आरोप आहे. सुशांतला चित्रपट पुरस्कार सोहळे किंवा इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात येत नव्हते. त्याला साइडलाइन करण्यात आले होते. त्यामुळे निराश होऊन त्याने आत्महत्या केली, असा त्यांचा आरोप आहे. जर या आठ जणांवरचे हे आरोप सिद्ध झाले तर त्यांना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

 • पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात आत्महत्येची पुष्टी

सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालाने त्याच्या आत्महत्येची पुष्टी केली. परंतु अद्याप पोलिस तपास चालू आहे.  

 • आतापर्यंत 30 हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे

14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यापासून आतापर्यंत 30 हून अधिक लोकांची या प्रकरणात चौकशी झाली आहे. यामध्ये त्याचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.

यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवली आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल. शानू शर्मा यांना पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावले जाऊ शकते.

याशिवाय चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि अभिनेत्री कंगना रनोट यांचीही पोलिस चौकशी करू शकतात. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीही काहीसे असेच संकेत दिले होते.  

Advertisement
0