आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Suicide Case| No Strangulation Marks Nor Nail Marks On His Body According To Final Postmortem Report Of Sushant Singh Rajput

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंतिम शवविच्छेदन अहवाल:गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडून झाला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू, शरीरावर कोणतीच जखम आढळली नाही  

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला आहे.
  • व्हिसरा अहवाल अजून येणे बाकी आहे, आतापर्यंत 23 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. आता अंतिम शवविच्छेदन अहवाल आला आहे. पाट डॉक्टरांच्या पथकाने हा अंतिम अहवाल तयार केला आहेत. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडून झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.  सुशांतच्या मृतदेहावर कोणतीच जखम नसल्याचीही माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

  • व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत पोलिस 

 रासायनिक चाचणीसाठी सुशांतच्या आतडयांचे नमुने सुरक्षित ठेवण्यात येतील व न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात येतील. शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वी सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याची शंका त्याच्या कुटुंबीयांनी वर्तवली होती. सोबतच त्यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

  • आतापर्यंत 23 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत 

सुशांतच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांनी त्याचे कुटुंब, मित्र, जुने मॅनेजर, टीमचे सदस्य, घरातील कर्मचारी आणि मैत्रीण रिया चक्रवर्ती यांच्यासह सुमारे 23 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यशराज फिल्म्सने कॉन्ट्रॅक्टची प्रतदेखील सादर केली आहे, ज्यावर सुशांतने 2012 मध्ये सही केली होती. त्याच्या डॉक्टरांचे विधान अद्याप घेण्यात आले नाही. त्याच्या सीएचा जबाब बुधवारी नोंदवण्यात आला आहे.

सुशांतच्या मृत्यूपूर्वीचे शेवटचे संभाषणही समोर आले आहे. चित्रपटाच्या संदर्भात सुशांतने मॅनेजर उदयसिंग गौरीशी अंतिम संवाद साधला होता. मंगळवारी पोलिसांनी त्याची माजी व्यवस्थापक आणि जुनी मैत्रीण रोहिणी अय्यरचाही जबाब नोंदवला.

  • मीडिया रिपोर्ट्सचीही पोलिस चौकशी करतील

डीएनएच्या वृत्तानुसार, सुशांतच्या मृत्यूबद्दल अनेक दावे करणार्‍या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मची चौकशी केली जाईल. महेश भट्ट यांच्याशी संबंधित बातम्यांच्या प्रकाशनावरही मुंबई पोलिस प्रश्न विचारू शकतात आणि ज्या फॅक्टवर हे रिपोर्ट लिहिण्यात आले, त्या वस्तुस्थितीची ते माहिती घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...