आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौकशी:सुशांत आत्महत्या प्रकरणाचा 16 वा दिवस; आता शेखर कपूर यांची चौकशी करणार मुंबई पोलिस, सुशांतसोबत बनवणार होते 'पानी' चित्रपट

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिस शेखर कपूर यांना चौकशीसाठी समन्स पाठवतील
  • 2013 मध्ये पानी प्रकल्प रखडल्यामुळे सुशांत डिस्टर्ब झाला होता

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला 16 दिवस उलटले आहेत. याकाळात मुंबई पोलिसांनी सुमारे 30 जणांची चौकशी केली आहे. त्याचा अखेरचा चित्रपट ठरलेल्या 'दिल बेचरा'मधील अभिनेत्री संजना सांघीचा मंगळवारी पोलिसांनी जबाब नोंदवला. दरम्यान, मुंबई पोलिस या प्रकरणात प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही चौकशी करणार असल्याची बातमी समोर आली आहे. यासाठी त्यांना समन्स पाठविले जात आहेत.

तू कोणत्या तणावाखाली होतास, हे मला ठाऊक होते - शेखर कपूर 

14 जून रोजी सुशांतच्या आत्महत्येनंतर शेखर यांनी एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून सुशांतच्या वेदनांबद्दल  ट्विट केले होते. ते म्हणाले होते, "सुशांत तुझ्या वेदनांची तुला ज्या लोकांनी दूर लोटले आणि निराश केले त्या लोकांबाबत मला माहीत आहे. त्यांच्याबद्दल सांगताना तू माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत होतास. गेल्या सहा महिन्यात तू तुझ्याबरोबर असायला हवा होतो. मला वाटते तू माझ्याशी बोलायला हवे होते. तुझ्यासोबत जे काही घडले ते त्यांचे कर्म आहे तुझे नाही," असे शेखर कपूर यांनी म्हटले आहे.

पानी ही कथा सुमारे 20 वर्षांपूर्वी शेखर कपूर यांनी लिहिली होती आणि 2040 च्या जगातील पाण्याच्या टंचाईवर आधारित हा चित्रपट होता, परंतु तो बनू शकला नाही. शेखर यांचे नाव तपासात का जोडले जात आहे याची 4 कारणे 1. आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्सने सुशांत सिंह राजपूतसह तीन चित्रपटांना करार केला. हे चित्रपट म्हणजे ब्योमकेश बक्षी, शुद्ध देसी रोमान्स आणि शेखर कपूरचा पानी हा होता. शेखर कपूरच्या चित्रपटानंतर खरी समस्या सुरू झाली. 2. यशराज यांनी दिवंगत सुशांत सिंह राजपूतशी केलेल्या आपल्या जुन्या कराराची प्रत पोलिसांना सादर केली. कॉपीमध्ये सुशांतबरोबर यशराजच्या तिन्ही चित्रपटांचा उल्लेख आहे, त्यापैकी दोन शुद्ध देसी रोमान्स आणि ब्योमकेश बक्षी बनले होते. तिसरा चित्रपट पानी हा बंद पडला. 3. शेखर कपूर पहिले हॉलिवूडसाठी पानी हा चित्रपट बनवणार होते, पण नंतर ते भारतासाठी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण चित्रपटाचे बजेट खूप वाढल्याने यशराजने यातून हात बाहेर काढले. येथून सुशांत आणि यशराज फिल्म्समधील नात्यात आलबेल नव्हते. आता पोलिस त्याच कोनातून तपास करू शकतात असं म्हणतात. 4. इंडस्ट्रीतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सुशांतने 'पानी' या चित्रपटासाठी बरेच चित्रपट सोडले होते, पण जेव्हा पानी हा चित्रपट बनला नाही, तेव्हा त्याने इतर बॅनरचे चित्रपट करण्यास सुरुवात केली. सुशांतने गोलिया की रासलीला - राम लीला आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांसाठी संजय लीला भन्साळींबरोबर करार केला होता.

बातम्या आणखी आहेत...