आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूसिव्ह:परिस्थिती बदलत आहे, आता थांबावे की बिहारला जावे याचा निर्णय होईल; सक्तीने क्वारंटाइन झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलले पाटण्याचे एसपी

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • दिव्य मराठीने पाटणाचे एसपी विनय तिवारी यांच्याशी विशेष संवाद साधला. त्यांनी सांगितल्यानुसार, मुंबईत त्यांच्या राहण्याचा सर्व खर्च बिहार सरकार उचलत आहे.
 • विनय तिवारी यांना विचारले गेले की, त्यांची टीम मुंबईतच राहणार की पाटण्याला परतणार?, यावर ते म्हणालेे - हे सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेले पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना बीएमसीने जबरदस्तीने क्वारंटाइन केले आहे. हा एक राजकीय स्टंट असल्याचे सूत्रांनी उघड केले आहे. 14 दिवसांऐवजी पुढील काही दिवसांत त्यांची सुटका होईल असेही बोलले जात आहे. जेणेकरून ते तपास पूर्ण करु शकतील. दिव्य मराठी सोबतच्या खास संभाषणात विनय तिवारी यांनी पोलिस विभाग आणि राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. संभाषणाचा काही भाग पुढीलप्रमाणे...

 • प्र. आपल्या सहका-यांनी जी चौकशी केली आहेत, त्यात आतापर्यंत कोणत्या गोष्टींचा उलगडा झाला आहे?

विनय तिवारी: मी आता हे सांगू शकणार नाही. पुढे कोणत्या गोष्टी होतील, याचा निर्णय बिहारच्या वरिष्ठ अधिका-यांच्या सूचनेवरच घेण्यात येईल.

 • प्र. असे ऐकिवात आहे की, कदाचित पुढच्या दोन-तीन दिवसांतच तुम्हाला सोडण्यात येणार आहे?

विनय तिवारी: तसे झाल्यास चांगलेच होईल.

 • प्र. सुशांतचा सीएच्या म्हणण्यानुसार त्याच्या खात्यातून कोणताही व्यवहार झाला नाही?

विनय तिवारी: मी या सर्व गोष्टींवर यावेळी भाष्य करू शकणार नाही कारण तपास चालू आहे. सध्या प्राथमिक तपास चालू आहे. अधिकाधिक लोकांचे जबाब नोंदवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्याकडे अद्याप ब-याच लोकांचे जबाब नाहीयेत.

 • प्र. बिहार पोलिसांचा काय अंदाज आहे? आत्महत्या की हत्या?

विनय तिवारी: एका विधानाच्या आधारे काही बोलता येणार नाही. संपूर्ण तपासणीनंतरच आपल्याला हे कळू शकेल की आत्महत्या आहे की हत्या?

 • प्र. परंतु टीव्ही चॅनेल्सवर जे एक्सपर्ट आपले मत मांडत आहेत, त्यांच्यानुसार आत्महत्या झाल्यास लिगेचर मार्क तसा नसतो?

विनय तिवारी: मी तुम्हाला सांगितले की यावेळी मी काही बोलू शकणार नाही.

 • प्र. आपले सहकारी आणखी किती दिवस मुंबईत राहणार आहेत?

विनय तिवारी: परिस्थिती बदलत आहे. ते बघता येथे थांबायचे की परतायचे याचा विचार सुरु आहे.

 • प्र. तुमचा मुंबईतील खर्च बिहार सरकार की महाराष्ट्र सरकार उचलत आहे?

विनय तिवारी: बिहार सरकारच्या आदेशानुसार काम करत आहे. येथील मुक्कामाचा सर्व खर्च बिहार सरकार उचलत आहे.

 • प्र. मुंबई पोलिस सहकार्य करत नसण्याचे काय कारण आहे?

विनय तिवारी: मी हे कसे सांगू? अधिका-याचे काम ड्युटी करणे आहे. माझे मत तेव्हाच येऊ शकेल जेव्हा पुरावा बाहेर येईल.

 • प्र. प्राथमिक स्तरावरच जर पुराव्यांसोबत छेडछाड केली गेली असेल तर सत्य बाहेर आणणे फार कठीण आहे?

विनय तिवारी: मी आता याबद्दल भाष्य करु शकत नाही. छेडछाड झाली की नाही हे सांगता येणार नाही. ज्या परिस्थितीत गोष्टी सापडतील त्या स्थितीत आपण काम केले पाहिजे. माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून या प्रकरणात न्याय मिळू शकेल.

 • प्र. पाटणा येथे मुक्कामाला असताना सुशांतसोबत कधी भेट झाली होती का?

विनय तिवारी: कधीच नाही.

बातम्या आणखी आहेत...