आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sushant Singh Rajput Suicide Case: Psychiatrist Reveals, Sushant Started Arguing With Him Only After Not Being Satisfied With Counseling

सुशांत आत्महत्या प्रकरण:मानसोपचार तज्ज्ञ डॉ. परवीन दराईच म्हणाले- 'सुशांतने उपचार अर्ध्यावरच सोडले होते'; अभिनेत्याला बायपोलर डिसऑर्डर असल्याचेही आले समोर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सोमवारी पाच तासांच्या लांबलचक चौकशीत डॉ. दराईच यांच्याकडे सुशांतचे काऊंसलिंग सेशन, त्यात आलेल्या अडचणी व औषधांच्या डोसविषयी प्रश्न विचारले गेले.
 • सुशांतच्या इतर दोन मानसोपचार तज्ज्ञ आणि एक मनोचिकित्सक यांच्याकडेही पोलिसांनी चौकशी केली आहे, त्यापैकी एकाने सुशांतच्या मानसिक आजाराचा उल्लेख केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सोमवारी मुंबई पोलिसांनी त्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. परवीन दराईच यांचा जबाब नोंदवला आहे. वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये सुमारे पाच तास झालेल्या चौकशीत दराईच म्हणाले की, सुशांत प्रथम त्यांच्याकडे 2018 मध्ये आला होता. जेव्हा त्याचे त्यांच्या समुपदेशनावर समाधान झाले नाही तेव्हा त्याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि उपचार अर्ध्यावरच सोडले. पोलिसांनी डॉ. दराईच यांच्याकडे सुशांतचे काऊंसलिंग सेशन, त्यात आलेल्या अडचणी व औषधांच्या डोसविषयी प्रश्न विचारले 

 • सुशांतला बायपोलर डिसऑर्डर होता 

पोलिसांनी डॉ. परवीन दराईच यांच्या व्यतिरिक्त दोन अन्य मानसोपचार तज्ज्ञ आणि एका मनोचिकित्सकासोबतही चर्चा केली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2019 पासून सुशांत त्यांच्याकडे उपचार घेत होता. चौकशी दरम्यान एका मानसोपचार तज्ज्ञाने सांगितले की, सुशांतला बायपोलर डिसऑर्डर नावाचा आजार होता. त्याच वेळी, उर्वरित डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याचे आयुष्य खूप तणावग्रस्त होते. मात्र, सुशांत एवढा तणावात का आला होता? याचे कोणताही डॉक्टर उत्तर देऊ शकला नाही.

 • बायपोलर डिसऑर्डर म्हणजे मानसिक आजार 

बायपोलर डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये माणसाचे वर्तन वेगाने बदलते. याला मॅनिक डिप्रेशन असेही म्हणतात. यामुळे त्रस्त असलेली व्यक्ती कधीकधी आसपासच्या लोकांवर विश्वास ठेवण नाही.  डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सुशांतचीही तीच स्थिती होती. त्यांनी पोलिसांना सांगितले की, सुशांत कोणत्याही डॉक्टरांना दोन किंवा तीन वेळा भेटायचा आणि नंतर डॉक्टर बदलायचा. कदाचित यामागचे कारण असे होते की त्याचा त्याच्या डॉक्टरांवर विश्वास नव्हता.

 • एप्रिलनंतर फोनवरच सल्ला घ्यायचा सुशांत

चौकशी दरम्यान जवळजवळ प्रत्येक डॉक्टरांनी कबूल केले की, सुशांत वेळेत औषधे घेत नव्हता. आणि जरी घेतले तरीही, अगदी थोड्या काळासाठीच घ्यायचा. त्याचबरोबर एप्रिलनंतर लॉकडाऊन झाल्यामुळे तो डॉक्टरांशी फक्त फोनवरच बोलायचा आणि सल्ला घ्यायचा. डॉक्टरांनी अशीही भीती व्यक्त केली की, सुशांतने कदाचित दोन-तीन महिन्यांपासून औषध घेतली नसावी किंवा त्यांचा सल्लाही ऐकला नसावा.

आतापर्यंत जवळजवळ 40 लोकांची झाली चौकशी 

 • 34 वर्षीय सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होते. सुशांतचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला असल्याचे पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात स्पष्ट झाले आहे.
 • पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. मात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन आणि त्याच्या घरात मिळालेल्या औषधांवरुन तो डिप्रेशनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु अद्याप आत्महत्येमागील खर्‍या कारणापर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत.
 • आतापर्यंत या प्रकरणी 40 जणांची चौकशी झाली आहे. यामध्ये चारही डॉक्टरांव्यतिरिक्त, चित्रपट समीक्षक राजीव मसंद, यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा, सुशांतचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीही आपला जबाब नोंदवला आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल. 
 • याशिवाय फिल्ममेकर संजय लीला भन्साळींचीही चौकशी झाली आहे. तर चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी ईमेलद्वारे आपला जबाब पोलिसांना पाठवला आहे. 
 • अभिनेत्री कंगना रनोटचीही पोलिस चौकशी करू शकतात. सुशांतला बॉलिवूडच्या नेपोटिज्मचा मोठा फटका बसल्याचा आरोप कंगनाने उघडपणे केला आहे, तर शेखर कपूर यांनीही काहीसे असेच संकेत दिले होते.  
 • दरम्यान, खासदार रुपा गांगुली, अभिनेता शेखर सुमन, टीव्ही अभिनेता तरुण खन्नासह अनेक जणांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक ईशकरण सिंह भंडारी यांना या प्रकरणातील तथ्यांची चौकशी करत असून सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करणे योग्य आहे की नाही हे तपासत आहेत.