आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरणातील अपडेट्स:सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांचा दावा - पुरावा मिटवण्यासाठी मुंबई पोलिस वेळ वाया घालवत आहेत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआय चौकशीची मागणी करणा-या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे प्रकरण जेव्हापासून मुंबई विरुद्ध पाटणा पोलिस झाले, तेव्हापासून या प्रकरणात मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद बनत चालली आहे. पाटणा एसपी विनय कुमार तिवारी यांना सक्तीने मुंबईत क्वारंटाइन करण्यात आल्यानंतर बिहार सरकारने आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. यानंतर सुशांतच्या कुटूंबाचे वकील विकास सिंह म्हणाले की, पुरावा नष्ट करता यावा यासाठी मुंबई पोलिस वेळ वाया घालवत आहेत.

एएनआय या न्यूज एजन्सीसोबत बोलताना विकास सिंह म्हणाले की, कुठलेही राज्य सरकार एका तपास अधिका-याला अशा प्रकारे क्वारंटाइन करेल, असे मला वाटत नाही. पोलिस अधिका-याला क्वारंटाइन करण्याचा अर्थ म्हणजे ते पाटणा पोलिसांचा तपास रोखण्यासाठी अडथळे आणत आहेत.

विकास सिंह पुढे म्हणाले की, प्रत्यक्षात मुंबई पोलिस वेळ वाया घालवत आहेत जेणेकरून पुरावे मिटवता येतील. म्हणूनच आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे असा निर्णय घेतला आहे.

सीबीआय चौकशीची मागणी करणा-या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली

यापूर्वी 4 ऑगस्ट रोजी मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र मुंबईतील मुसळधार पावसामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या याचिकेत सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख जाहीर केलेली नाही. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही गेल्या महिन्यात याच मागणीची याचिका फेटाळली होती.

दुसरीकडे रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर 5 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये अशी मागणी केली गेली आहे की, सुशांतच्या खटल्याची चौकशी मुंबईतच झाली पाहिजे. 3 एजन्सी सुशांतच्या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबईनंतर पाटणा पोलिस आणि ईडीनेदेखील या प्रकरणात उडी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...