आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियाच्या आयटीआरमधून धक्कादायक खुलासा:दोन वर्षांत 37 लाख रुपये उत्पन्न, तरीही 76 लाखांचे शेअर खरेदी केले, 1 कोटींहून अधिकची मालमत्ता विकली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीचे उत्पन्न कमी असताना गुंतवणूक अधिक कशी, याचा तपास ईडी करत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या रिया चक्रवर्तीच्या आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न्स) च्या तपशीलातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार 2017-18 मध्ये रियाने आपली कमाई 18.85 लाख रुपये दाखविली. तर 2018-19 मध्ये 18.35 लाख रुपये कमाईचा उल्लेख आहे. असे असूनही, या दोन्ही वर्षांत तिने केलेली गुंतवणूक ही कमाईपेक्षा अदिक आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रियाच्या या अतिरिक्त कमाईचे स्रोत शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

रियाच्या गुंतवणूकीत आणि मालमत्तेत वाढ खालीलप्रमाणे आहे.

  • 2018-19 मध्ये रियाची स्थिर मालमत्ता 9 लाख रुपयांवर पोहोचली, जी आधी फक्त 96 हजार रुपये होती.
  • 2017-18 मध्ये रियाची कमाई 18.85 लाख रुपये होती. पण तिने 34 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. ते कसे केले? ईडी याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • रियाचा शेअर होल्डर फंड 2018-19 मध्ये 34 लाखांवरून 42 लाखांवर पोहोचला. दोन वर्षांत रियाने 76 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
  • रियाच्या एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत असलेल्या ठेवींचीही ईडी चौकशी करीत आहे.
  • 2017 ते 2019 दरम्यान आयटीआरमध्ये कोणत्याही मोठ्या व्यवहाराची माहिती नाही.

रियाने दोन वर्षांत एक कोटीची मालमत्ता विकली

आयटीआरमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. तो म्हणजे रियाने 2017-18 मध्ये मालमत्ता विकून 45 लाखांची कमाई केली. तर 2018-19 मध्ये तिने 58 लाख रुपयांची मालमत्ता विकली होती. रियाने दोन वर्षांत एकुण एक कोटी तीन लाख रुपयांची मालमत्ता विकली होती. परंतु, दोन वर्षांत तिने केवळ 37.2 लाख रुपये कमावले असताना एवढी मालमत्ता कशी जमवली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ईडीने रियाकडे प्रॉपर्टीची कागदपत्रे मागितली आहेत.

सुशांतच्या दोन कंपन्यांची चौकशी झाली आहे

वृत्तानुसार, ईडीने सुशांतच्या दोन कंपन्यांचा तपास पूर्ण केला आहे. त्याच्या एका कंपनीची नोंदणी हरियाणातील पत्त्यावर आहे, याची चौकशी अद्याप बाकी आहे. ईडी रिया, तिचे वडील इंद्रजित आणि भाऊ शोविक चक्रवर्ती यांची चौकशी करत आहे. परंतु अद्याप त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. या प्रकरणात रियाचे सीए रितेश शाह, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि फ्लॅट-मेट सिद्धार्थ पिठानी यांचीही चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...