आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या बँक स्टेटमेंटमध्ये उलगडले रहस्य:रिया चक्रवर्तीने पाच वेळा पूजा-पाठ करण्यासाठी पैसे काढले होते, कुटुंबाचा दावा - पैशांचा वापर सुशांतवर जादू-टोना करण्यासाठी करण्यात आला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या बँक स्टेटमेंटनुसार 90 दिवसांमध्ये बॅलेन्स 4.64 वरुन 1.4 रुपयांवर आला होता
  • खात्यामधील जास्तीत जास्त पैशांचा वापर रिया चक्रवर्तीचा मेकअप, शॉपिंग आणि तिच्या भावाच्या खर्चांवर झाला

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविषयी धक्कादायक खुलासा झाला आहे. एका वृत्तानुसार, कोटक महिंद्रा बँकेकडून अभिनेत्याच्या खात्याचा तपशील समोर आला आहे, त्यानुसार पाच वेळा पूजा-पाठ आणि पंडित यांना देण्याच्या नावावर पैसे काढण्यात आले. जादू टोना करण्यासाठी रियाने हे पैसे वापरल्याचा गंभीर आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आजच्या रिपोर्टनुसार, कोटक महिंद्रा बँकमधून सुशांतच्या खात्याचे ते पेपर आले आहेत. त्यामध्ये 2019 मध्ये 14, 22 जुलै, 2,8 आणि 15 ऑगस्टला पूजा-पाठच्या नावावर पैसे काढण्यात आले. 15 ऑगस्टनंतर अशा प्रकारचे काम करण्यासाठी कोणतेही पैसे काढण्यात आले नाहीत. कोणत्या तारखेला किती पैसे काढण्यात आले याविषयी सविस्तर माहिती आली आहे.

90 दिवसांमध्ये 3.24 कोटींचे ट्रांजेक्शन
या रिपोर्टनुसार सुशांतच्या बँक खात्यामध्ये 4.64 कोटी रुपये बँलेंस होते. जे 90 दिवसात कमी होऊन 1.4 कोटींवर आले. जो पैसा सुशांतच्या खात्यामधून काढण्यात आला किंवा ट्रान्सफर झाला. त्याचा जास्तीत जास्त वापर रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांसाठी झाला. रिपोर्टमध्ये काही खर्चांचे डिटेलही देण्यात आले आहेत.

14 अक्टोबर 2019 ला बॅलेन्स 4.64 कोटी रुपये
14 अक्टोबरला रियाचा भाऊ शोविकच्या अकाउंटमध्ये 81,901 रुपये ट्रान्सफर झाले.
15 अक्टोबरला 4.7 लाख रिपोय रियाचा भाऊ शोविकच्या हॉटेलच्या खर्चासाठी पाठवण्यात आले.
15 अक्टोबरला 2019 ला 4.3 लाख रुपये दिल्लीच्या हॉटेल ताजमध्ये राहण्यासाठी पाठवण्यात आले.
16 अक्टोबर 2019 ला रिया आणि शोविकच्या दिल्लीच्या विमानाच्या तिकीटासाठी 76 हजार रुपये पाठवण्यात आले

याच्या पुढच्या काही दिवसात वेगवेगळ्या अमाउंटच्या माध्यमातून लाखो रुपयांचे ट्रांजेक्शन झाले 14 नोव्हेंबर 2019 ला रियाच्या नावावर दीड लाखांचे ट्रांजेक्शन झाले. 20 आणि 21 नोव्हेंबर 2019 ला रियाच्या मेकअप आणि शॉपिंगवर 75 हजार रुपये खर्च झाले. 24 नोव्हेंबर 2019 ला रियाची शॉपिंगवर 22,220 रुपये खर्च झाले. 25 नव्हेंबरला याच खात्यामधून रियाच्या भावाची ट्यूशन फीस देण्यात आली.

बँक अकाउंटच्या डिटेलनुसार, रेगुलर बेसिसवर सुशांतच्या खात्यात अनेक ट्रांजेक्शन झाले. जे रिया आणि तिच्या कुटुंबीयांच्या नावावर होते. एक मोठी रक्कम कॅशही काढण्यात आली. मात्र याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खात्यामध्ये जमा असलेल्या पैशांचा मोठा भाग हा सुशांतचा वयक्तिक खर्च आणि टॅक्स पेमेंटच्या रुपात खर्च झाला. 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे त्याने जीएसटीचे दिले होते.

पोलिसांनी फायनेंशियल ट्रांजेक्शनची चौकशी करावी - कुटुंबियांची मागणी
दुसरीकडे सुशांतच्या कुटुंबाने दावा केला आहे की, सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये हे रिया आणि तिच्या जवळच्या लोकांसाठी खर्च झाले आहेत. त्याचे वकील विकास सिंह बोलताना म्हणाले की, 'पोलिसांनी सुशांतच्या फायनेंशियल ट्रान्जेक्शनची चौकशी करायला हवी. सुशांत पूर्णपणे रियाच्या कंट्रोलमध्ये होता. त्याचे क्रेडिट कार्डही रिया वापरत होती. मात्र रियाने हे दावे फेटाळून लावले आहेत. तिचे म्हणणे आहे की, ती आणि सुशांत लिव्ह-इन मध्ये राहत होते. तिच्यावर लावलेले आरोप निराधार आहेत'

बातम्या आणखी आहेत...